जनार्दन स्वामी अभंग गाथा – एकूण १९ अभंग (ताटीचे)
जनार्दन स्वामी अभंग – १
चहुं युगामाजीसिद्ध संत झाले ।
योगेंचि तरले होती तेही ॥१॥
नोहेंचि उद्धार राजयोगे वीण ।
घाले राम कृष्ण हरि हर ॥२॥
योगेंचि ते मुक्त शुकसनकादिक ।
नारद जनक शिव उमा ॥३॥
राजयोगी पुर्ण स्वामी दत्तात्रेय ।
जनार्दना दावी सिद्धमार्ग ॥४॥
योगेंनि साधक झाले स्वयें देव ।
जाणती वैष्णव स्वानुमवी ॥५॥
कवण चौपुडें तेथं सुरनर ।
न येचि ढेंकर तृप्तीविण ॥६॥
अनुभवें तेंचि होवोनिया आपण ।
स्थापिती कर्म ज्ञान भक्ति नाम ॥७॥
नेणोनि उद्धोध वेति भ्रम मुढ ।
आवडे तें वाड म्हणती हेंचि ॥८॥
धिक्कारिती विषय झाल्या गर्भ स्थीर ।
त्यागों नये घराचार म्हणुनी येरी ॥९॥
योगेविण प्राप्त कैवल्य तया नाश ।
बाह्मनामें ओस भक्ति ज्ञानें ॥१०॥
नलमे अक्षयसुख केलियांही कांहीं ।
व्यर्थनाम तें ही योगेविण ॥११॥
यागेंची होवोनि जपती तें नाम ।
नारदा वाल्मीक व्यास शीव ॥१२॥
न येता रुपासी आधी कैचें नाम ।
लक्षोनि श्रीराम गावें तया ॥१३॥
योगेंवीण नाहीं स्त्रियां पुरुषां गती ।
न चुके अधोगती करिता सर्व ॥१४॥
म्हणोनि गुरुसी व्हावें सर्वस्वे अर्पण ।
खेचरा शरण नाम ॥१५॥
म्हणे जनार्दन सावध हो उठी ।
उघडी भ्रम तो एकनाथ ॥१६॥
जनार्दन स्वामी अभंग – २
लाभोनी हा जन्म मंत्रे कां फसावें ।
आंतचि रिघावें शरण गुरुसी ॥१॥
त्यजुनि शास्त्र शंका मान महत्व लज ।
वराव पुन्हा राजयोगीमंत्र ॥२॥
देववावा आधईं कांतेसी मग स्वयें ।
घ्यावा संप्रदाय उपदेश ॥३॥
करो नये विचार जरी आड येती ।
वाळवेही पती माता पिता ॥४॥
बुड्विती स्वहित तेचि साच वैरी ।
नेती यमपुरी पुर्वजेंसी ॥५॥
खोवाव कां तारुं अक्षय ब्रह्मदाता ।
जन्मीचेया कांता पती सर्व ॥६॥
झाले जे अनन्य राजयोगीयांसी ।
नलगे तयासी करणें योग ॥७॥
होवोनि जीवें दासी राजयोगीयाची ।
पावावें पद तें ची तयासंगे ॥८॥
नाहीं भरंवसा आयुष्य बुडबुडा ।
नाशायां बापुडा मग म्हणे ॥९॥
सांगे गुरु तेंचि करावें सर्व देहें ।
हें करी नोहे हें म्हणे नये ॥१०॥
गात्र शक्ती तारुण्य इंद्रिये जंव तंव ।
व्हावे देहें देव नोहे मग ॥११॥
म्हणे जनार्दन सदुरुपायी लोटी ।
उघडी भ्रमताटी एकनाथा ॥१२॥
जनार्दन स्वामी अभंग – ३
राजयोगेंवीण न कळे ब्राह्मज्ञानें ।
प्रमाणें अनुमानें मेलियांही ॥१॥
पाहोनियां ग्रंथ केलिया ते खुण ।
न लमें दिल्या प्राण अनंतजन्में ॥२॥
व्रते तपें नेम केलियां पठण ।
प्रतिमा पाषाण पुजिलियां ॥३॥
न लभे जनघमें मत अभिमानें ।
तीर्थ उद्यापनें लक्षकोटी ॥४॥
पढों नये ग्रंथ त्यागावा कुळधर्म ।
न घ्यावें जनकर्म उदाहरण ॥५॥
सेवावें उच्छिष्ठ निर्माल्य गुरुतीर्थ ।
ऐको नये मात कवणांची ॥६॥
न करतां ग्रहण सेवों नये काहीं ।
अर्पावें सकळही श्रीगुरुसी ॥७॥
मानों नयें विटाळ राहों भलतें स्थिती ।
स्पशें दग्ध होती पापें सर्व ॥८॥
जोडती ते मेरू पुण्याचें अगणीत ।
पावन समस्त श्रीगुरुचेनी ॥९॥
दर्शन पूजन गुरुशेषेंवीण ।
सेवन ग्रहण पातकची ॥१०॥
गुरुच्या अमक्तांचें वर्जावें दर्शन ।
निश्चयें पतन तयासंगें ॥११॥
पाहों नये शास्तरें पुराणें चरित्रें ।
करावीं गुरुशास्त्रें पठण नित्य ॥१२॥
नलगे स्मार्त शैव वैष्णवादि मत ।
मेदाभेद व्यर्थ तर्कवाद ॥१३॥
संती सांगितलें तेचि आचरावें ।
व्हावें निज वैष्णवे ज्ञानें निज ॥१४॥
घेवों नयें तर्क दोषादि कल्पना ।
विचार वल्गना वाद शंका ॥१५॥
असो मलतैसे निंद्यही का नीच ।
परी योग्य तेंच करावयां ॥१६॥
श्रीगुरुंचे दास जगीं म्हणवावें ।
नाडले थोर थोर गर्वे अभिमानें ॥१७॥
म्हणें जनार्दन हे तें व्यर्थ आटी ।
उघडी भ्रमताटी एकनाथा ॥१८॥
जनार्दन स्वामी अभंग – ४
मिरवोनि ज्ञान पसरिती ढोंग ।
निंदिती राजयोग मुर्खपणें ॥१॥
तेचि निःसंशय जाणावे अभक्त ।
तारक एकचि सत्य राजयोग ॥२॥
गुरुचिया दाप्तां लेखिती सामान्य ।
नेणोनि प्रमाण संतांचे तें ॥३॥
सांगतीं मोळियां सर्वाचि श्रेष्ठ मार्ग ।
संती राजयोग वाळिया हें ॥४॥
तयांपाशी स्थीर नोहावें क्षणैक ।
नाशे अक्षयसुख तयां संगे ॥५॥
सद्भावें रिघावें शरण योगियांसी ।
द्यावा पायांपाशी बळी जीव ॥६॥
नेदी संप्रदाय नेम आचरण ।
नोहावें शरण ऐशां काहीं ॥७॥
ऐसियाचा संग झाल्या क्षण एक ।
त्याहुनी नसे पातक ब्रह्माडींहीं ॥८॥
ढळों नये कोणी केलियांही विघ्न ।
साधावें संपुर्ण याचि देहें ॥९॥
हणें जनार्दन सकळ याचिसाठी ।
उघडी भ्रमताटी एकनाथा ॥१०॥
जनार्दन स्वामी अभंग – ५
श्रीगुरुठायी सर्व अर्पोणि विश्वास ।
करावा अभ्यास गुरु निकट ॥१॥
मात्र जंव नाहीं विषयी अभिरुची ।
करावा तंवची अभ्यास हा ॥२॥
नव्हतां ऐसें तरी वीस पंचवीस ।
निकृष्ट ते तीस मर्यादा हे ॥३॥
केलियाहि साधे चाळीस तोंवरी ।
साधे मगही परी येवोनि जन्मा ॥४॥
सारोनिया आधीं साधनें संपुर्ण ।
रचावें सासन गुरुकृपें ॥५॥
नित्यनिशीं एकांती द्वादश वर्षे वरी ।
अद्वय श्रीहरी प्रगटेल ॥६॥
कोटी सुदर्शनें अनंत रवी दीप्ती ।
देही निर्वाळिती तेज प्रमा ॥७॥
अमित चंद्र सुर्य उन्मनीचे तेज ।
तुंचि तु सहज होशी तेणें ॥८॥
सुखाचा सागर आनंदाचा कंद ।
सर्वत्र गोविंद होशील तु ॥९॥
नसे या पर तें ब्रह्मांडी आणिक ।
निर्वाणिंचे सुख मोठें आहे ॥१०॥
घाले संत यांचि गुरुकृपा ज्ञानें ।
लामतां जें होणें आपेआप ॥११॥
देहीचा निजदेव लक्षाव प्रत्यक्ष ।
ज्ञान अपरोक्ष तें हें ऐसें ॥१२॥
ऐशा आत्मज्ञानें व्हावें ब्रह्मा ।
वर्णिती निगम शास्त्रें संत ॥१३॥
ज्ञानवीण कळा तेचि अवकळा ।
नलभे सोहळा ब्रह्मीची तो ॥१४॥
एक गुरुकृपाज्ञानचि तारक ।
नसेनि आणिक त्रिभुवनीं ॥१५॥
याचि लागीं तेहि गुरुसी शरण ।
प्रत्यक्ष राम कृष्ण हरि हर ॥१६॥
न करितां विचार शरण योगी यांसी ।
व्हावें कवणांसी पुसी नये ॥१७॥
होका मायाबाप गुरु देव पती ।
ऐकों नये येती आड जरी ॥१८॥
येती आड जाती नेमें तें पतनी ।
कुळेंसि अक्षय दोन्हीं बेचाळीस ॥१९॥
माता पिता पती जरी गुरु थोर ।
नाही अधिकार वर्जावया ॥२०॥
अथवा तयां मयें नव्हतां शरण ।
निश्चयें पतन घडे तयं ॥२१॥
यालागी रिघावें योगियां शरण ।
न लावितां क्षणः साधावें तें ॥२२॥
जरी नोहे साध्य पुर्ण जन्में याचि ।
गुरुदासां साधेचि जन्मोनिया ॥२३॥
वायां गेले ऐसें नाही आयकिल ।
शरण रिघाले योगीयाचे ॥२४॥
अनन्य जे भावें योगियांचे झाले ।
निश्चये उद्धरिले तेव्हांचि ते ॥२५॥
येर व्यर्थ कानी सांगती अक्षरु ।
म्हणतां तया गुरु महादोष ॥२६॥
तोचि गुरु नेत्रीं दावी देही देव ।
कृपा अनुभव साक्षात्कार ॥२७॥
म्हणे जनार्दन पहावा अंतर्द्दष्टी ।
उघडी भ्रमताटी एकनाथा ॥२८॥
जनार्दन स्वामी अभंग – ६
नाम भक्ति ज्ञान उपासना दीक्षा ।
व्यर्थ आत्मसाक्षात्कारें वीण ॥१॥
क्रिया कर्म धर्म साधनें वैराग्य ।
कृपेविण योग प्राणायाम ॥२॥
राजयोगेवीण केलिया सकळ ।
होवोनि निर्फळ लाभे शीण ॥३॥
घेती क्लेश दुःख करिती घौती वस्ती ।
दंडिती जाळिती व्यर्थ देहा ॥४॥
सोशिती सतत श्रम प्रहर आठ ।
न लभे देव कष्टविल्या देहा ॥५॥
करिती चमत्कार ब्रह्माडींचे सर्व ।
दाविती भक्तिभाव कळा विद्या ॥६॥
जेथें दंभ वेष चमत्कार सिद्धि ।
नवजावें कधीं चुकोनिया ॥७॥
असावें सतत श्रीगुरुसन्निध ।
मोगावा ब्रह्मानंद संसारचि ॥८॥
घेवो नये वेष साधु त्वहि दंभ ।
दाखवावी ढब नट जैसा ॥९॥
चुकोनि घेतां वेष जाये राजयोग ।
न भेटेचि मग देव काहीं ॥१०॥
असोनि सकळी वित्त श्रमें मेळवावें ।
तेणें नित्य भोगावें सेवासुख ॥११॥
जगीं म्हणवावें प्रपंची या मावा ।
दंडो नये जीवा देहा व्यर्थ ॥१२॥
म्हणे जनार्दन नलमे देव हटीं ।
उघडी भ्रमताटी एकनाथा ॥१३॥
जनार्दन स्वामी अभंग – ७
भेटला अवचित भाग्यें राजयोगी ।
पुसावे तयालागी सकळी प्रेमें ॥१॥
अथवा पडे कणी योगी हे आवांका ।
आणावे शिबिका गजरेशी ॥२॥
द्यावे अपार घन वस्त्रें अलंकार ।
पदार्थें उपचार राजभोग ॥३॥
देवो नये क्लेश दुःखद ते भोग ।
जेणे होय मंग संतोषासी ॥४॥
नेमें घ्यावें वर्षे द्वादश ठेवोनि ।
प्रेमे विनवोनि सकळीं नित्य ॥५॥
करों देवों नये श्रम योगियासी ।
आद्य हे देवासी वद्ययोगी ॥६॥
आवदे जें तेंचि पुरवावे सर्व ।
देवाचाही देव योगी ब्रह्मा ॥७॥
करावी सकळ योगियाचि सेवा ।
तेणे श्रीकेशवा तोष होये ॥८॥
सहज राजयोगी झालिया प्रसन्न ।
मिटे जन्म मरण भवबंध ॥९॥
येवोनिया योगी झालिया अव्हेर ।
तेणे सर्वेश्वर होय दुःखी ॥१०॥
न करविती शरण स्त्रियापुत्रादिका ।
जाती ते नरका कल्पवरी ॥११॥
अंतरविती योगी भेटोनि श्रीराम ।
दंडी म्हणुनी यम आत्मवैरी ॥१२॥
फिरोनि सकळां विनवावें सप्रेम ।
वर्णोंनि महात्म्य योगियांचे ॥१३॥
नेमें नारी नरा करवावें शरण ।
तेणें वाढे पुण्य फळ कृपा ॥१४॥
न करितां न सधे आत्मसहित ।
अंतरे अनंत नलमे कही ॥१५॥
अनन्य शरण झाले योगियासी ।
घडले सर्व त्यासी केल्यावीण ॥१६॥
झाली दग्ध पापें कोटी अगणीत ।
जोडले पर्वत पुण्याचे ते ॥१७॥
योगयाग सर्व तयासी घडले ।
कुळें उद्धरिलें बेताळीस ॥१८॥
झाले हरि हर वश तोचि मुक्त ।
करोनि आलिप्त पापपुण्यें ॥१९॥
योगी यांची सेवा करी ब्रह्मा स्वयें ।
भोगोनि ऐश्वर्य देहे गेहें ॥२०॥
नामें उपासना कमें तपें घोर ।
होती चमत्कार थोर जनीं ॥२१॥
देतां ताप देहा होती प्राप्त सिद्धि ।
परी ते उपाधी क्षणीकची ॥२२॥
न तरती त्रिशुद्धी तेणें आपणची ।
येरां उघ्घाराची मात कैची ॥२३॥
अक्षय निजसिघ्घी योगेंचि पं प्राप्त ।
व्हावें ब्रह्मीं मुक्त देहेंचि तें ॥२४॥
म्हणोनि शरण व्हावें उपेदशिकें आधीं ।
होवोनि पूर्ण बोधी तारावें जना ॥२५॥
म्हणे जनार्दन तरले असंख्य कोटी ।
उघडी भ्रमताटी एकनाथा ॥२६॥
जनार्दन स्वामी अभंग – ८
दुर्लभ नर जन्म भाग्योदय वेळ ।
जिंकुनी कळी काळ व्हावे मुक्त ॥१॥
प्राप्तवेळे जना बुडाले डोहळे ।
पुन्हा हा न मिळे कांही केल्या ॥२॥
वेष दंभ ज्ञान सकळांसी मान्य ।
म्हणती शरण होऊ तया ॥३॥
त्यागोनि हेंमौढ्य मनें सावधान ।
करावेम नित्य श्रवण गुरुशास्त्र ॥४॥
करोनि मनन तेंचि आचरावें ।
सदुरुप्ती व्हावे शरण भावें ॥५॥
करो कांही आज्ञा तैसेची करावें ।
तेंचि करवावें सकळां कडोनि ॥६॥
वाद भेद वर्म त्यागोनिया अन्य ।
व्हावे पैं शरण योगी यासी ॥७॥
म्हणे जनार्दन घावो नये होटी ।
उघडी भ्रमताटी एकनाथ ॥८॥
जनार्दन स्वामी अभंग – ९
सदगुरुची सेवा करोनि संपुर्ण ।
करावें प्रसन्न सर्व भावें ॥१॥
कायावाचामनें जिवें प्राणें धनें ।
सबाह्म अर्पण सर्व स्वेशीं ॥२॥
ऐशा सेवेवीण होये मंत्र व्यर्थ ।
मेल्या नोहे प्राप्त खुण तेही ॥३॥
दिनि निशी नित्य एकांती लोकांती ।
वरी असो स्थिती भलत्याही ॥४॥
करावी सर्व सेवा ब्रह्माभावेम साच ।
विसरोनी नीच उत्तम हे ॥५॥
आप्त गणगोत घेवोत पै शंका ।
जावो प्राणही कां होवो कांहीं ॥६॥
जपावें अखंड श्रेगुरुचेचि नाम ।
वंदावे सप्रेम तयासची ॥७॥
सर्वस्वें सबाह्म सेवानीच दास्य ।
करावें अहर्निश श्रीगुरुचेचि ॥८॥
करावी श्रवण श्रीगुरुचीच किर्ति ।
पुजावें प्रेमे अती तारकाची ॥९॥
गावे चरित्रासी श्रीगुरुच्याचि मुखें ।
आणिक साधकें वर्णो नये ॥१०॥
व्हावें अंतर्बाह्म सर्वस्वें अर्पण ।
अखंड अनुदीन तारकांचि ॥११॥
श्रीगुरुसीच नित्य आचरावें सख्यं ।
मजावें आणिक सर्वभावें ॥१२॥
करितां भोगितां अखंड सतत भावें ।
सकळ भोगवावें श्रीगुरुसचि ॥१३॥
मावो नये अन्य घ्यावो नये अन्य ।
श्रीगुरु वाचोन ब्रह्मा तेंही ॥१४॥
घेवोनि शपथ श्रीगुरुरंगी नित्य ।
रंगवावी चित्त वृत्ति सर्व ॥१५॥
अर्पावा क्षणक्षणीं सकळ देह प्राण ।
आलिंगावे लीन व्हावें रुपीं ॥१६॥
मिळवावें वित्त श्रीगुरुसेववार्थची ।
भोगावे प्रपंची तारकाची ॥१७॥
वागावे एकची श्रीगुरुव्रतधर्मे ।
अन्य धर्म नेमे वर्जावे ते ॥१८॥
वाटे तेचि श्रीगुरु करो भोगो कांहीं ।
वाळावएं ब्रह्माही तयापुढे ॥१९॥
परि जीतमेल्या सोडो नये काहीं ।
श्रीगुरुसी कांहीं वंचो नये ॥२०॥
दव्डो नये पळ निमैअष सेवेवीण ।
होवोनि उत्तीर्ण देहे जीवें ॥२१॥
गुरुसेवे ऐसे नाहीची त्रिभुवनीं ।
ऐसें हें पुरणी वर्णीयेलें ॥२२॥
फेडितां खंडिती सकळही ऋण ।
परि गुरुऋण न खंडेची ॥२३॥
या लागी सेवावें अखंड तारका ।
लौकिक शास्त्र शंका त्यागोनिया ॥२४॥
बोधोनि सकळां करवावें हेची ।
नित्य श्रीगुरुची सर्व सेवा ॥२५॥
पसरोनि ओटी मागावी पै मीक्षा ।
महत्व कीर्ती आशा त्यागोनिया ॥२६॥
होवोनी या दीन करावी याचना ।
विनवावें जना सेवेसाठीं ॥२७॥
वैभव जीवीत चार्ही पुरुषार्थ ।
करावी तेणें नित्य एक सेवा ॥२८॥
गुरुसेवेसाठी ब्रह्माडही थोडें ।
नपुरे बापुडे इंद्रपद ॥२९॥
ऐसे अनन्य झाले तेचि उघ्घरिले ।
गुरुवीण गेलें घोर नर्फी ॥३०॥
तेथें भ्रमें मुढ वाहति ते गर्व ।
नेणोनि सेव द्रव्य स्वामिचें हें ॥३१॥
कैचें शिष्यपण सबाह्म अर्पण ।
व्यर्थ भणभण शब्दाचीच ॥३२॥
कैची श्रीगुरुठायीं परब्रह्मा भावना ।
अंतरी कल्पना मानव हें ॥३३॥
साच जे अनन्य करिती त्यांचे दास्य ।
अहनिशीं मोक्ष मुक्ती चार्ही ॥३४॥
नांदे वैकुंठेसी लक्ष्मीसह हरी ।
नित्य तया घरीं सदोदित ॥३५॥
दर्शने तयांच्या पावन देव होती ।
पापी उघ्घरती महादोषी ॥३६॥
मौनावला शेआष तयाचें महात्म्य ।
वर्णिता निगम भारती ही ॥३७॥
सेवावें तारका सबाह्मों सर्वेस्वें ।
घनें प्राणें जीवें सर्व देहें ॥३८॥
ऐसा होये त्यासी द्यावें कृपा घन ।
येरां गेल्या प्राण देवो नये ॥३९॥
जाय दिघलिया बुडोनी सकळ ।
होवोनि निर्फ्ळ श्रम सर्व ॥४०॥
आधी मद्य कुंभ निर्वाळिल्यावीण ।
घालीता पावन नोहे दुग्ध ॥४१॥
म्हणे जनार्दन न चले हातवाटी ।
उघडी भ्रमताटी एकनाथा ॥४२॥
जनार्दन स्वामी अभंग – १०
गुरुनिकट वासगुरु मुखें श्रवण ।
मनन आचरण सर्व स्वेसी ॥१॥
झाल्यावीण आधीं साधनी प्रवीण ।
शिष्या आत्म खुण देवो नये ॥२॥
ऐसे झाल्यावेन दिधल्या नोहे ।
प्राप्त नोहेचि उद्धार बुडे अधिक ॥३॥
तेवी देवो नये शिष्य झाल्या वीण ।
दिधल्यावीण मंत्र संप्रदाय ॥४॥
करोनि पुजन आधी झाल्यावीण ।
सबार्ह्म अर्पण सर्वस्वेशीं ॥५॥
गुरुशिष्यीं हो मर्यादा सांडिली ।
यालागी बुडाली योगास्थिती ॥६॥
लक्षो निया देही भजावा श्रीराम ।
तारक तें नाम ते चि भक्ति ॥७॥
जपती तेंचि नाम संत हरि हर ।
बाह्म दंभ येर अमक्ति ते ॥८॥
येथें सर्व पात्र नारी नर शुद्र ।
असे अधिकार सकळांसी ॥९॥
आळसें अभिमानें खोवुं नये स्वहित ।
वदोनि भगवंत बुद्धी दाता ॥१०॥
व्हावया उद्धार पाहती पितरे वास ।
आतांची श्रीगुरुस शरण व्हावें ॥११॥
नोहे जो प्रत्यक्ष स्वानुभर्वे मुक्त ।
भुमीवरी व्यर्थ जन्मा आला ॥१२॥
म्हणे जनार्दन स्वानुभव घाटी ।
उघडी भ्रमताटी एकनाथा ॥१३॥
जनार्दन स्वामी अभंग – ११
आले श्रीगुरुनाथ अथवा येती कळे ।
व्हावें उतावीळ जावें तेथे ॥१॥
आणावे सेवावें सर्वस्वे निरंतर ।
तरीचशिष्य येर जाती नरका ॥२॥
असो कांही काज हर्ष का संकट ।
समय प्राणांत होवो कांहीं ॥३॥
देवो कोणी ताप जावो देह प्राण ।
उडवो शीर आण शपथ वाहो ॥४॥
जावो देवो नये तारकासी कंही ।
पडो ब्रह्मांडही कोसळोनि ॥५॥
घाडलिया होय सर्वस्वाची बुड ।
पुरवावे कोड सर्व कांही ॥६॥
विकावे देहें धरुं नये लाज ।
साधावें निजकाज याचि देहें ॥७॥
घेवोनि शपथ होवोनि निर्भय ।
वरावे अक्षय तारकासी ॥८॥
दिधले देवें गात्र शक्ति हें वैभव ।
मन बुद्धी सर्व अंतरबाह्म ॥९॥
न मिळे न जन्म ऐसा हा पुढती ।
खोविल्या मागुती कांही केल्या ॥१०॥
नेमें नित्य निशी साठ घटीं आत ।
साधावे निजहित झटी एक ॥११॥
नसेचि सुलभ राजयोगा ऐसें ।
याचि देहीं दिसे देव डोळां ॥१२॥
एकांती अभ्यास निकट गुरुक्षेत्री ।
करावा बसोनि घरीं करु नये ॥१३॥
पुरुषें पत्नीसह करावा अभ्यास ।
घ्यावा उपदेश उमयतां ॥१४॥
आकारिली वस्तु रुपें स्त्रीपुरुष ।
एकचि प्रत्यक्ष मासे दोन ॥१५॥
म्हणोनि श्रौत स्मार्त योगयाग सर्व ।
करावें सर्वथैव पत्नीसह ॥१६॥
मोगोनि विलास साधावा राजयोग ।
हटी तो निहर्ग वसे वनी ॥१७॥
असोनिया पत्नी करोनये एकाकी ।
नेदावे कवतिकी तारकेही ॥१८॥
वदो नये निमित्त काम धंदा आळस ।
निर्वाहाचे मीष सच्छिष्येंही ॥१९॥
सेवनी प्रेमें सुखें राहोनी संसारी ।
व्हावे स्वयें हरी आपेंआप ॥२०॥
म्हणे जनार्दन साठवावा संपुटी ।
उघडी भ्रमताटीएकनाथ ॥२१॥
जनार्दन स्वामी अभंग – १२
होवोनिया जगी योगिया शरण ।
करो नये अन्य गुरु मग ॥१॥
घेतां आणिकांचा चुकोनीही मंत्र ।
बुडोनी परत्र पतन होय ॥२॥
जाती ते दोघेही पतनी अक्षय ।
आकल्प उभय कुळासह ॥३॥
न होती तयांसी तारु हरी हर ।
मोगिती अघोर पुर्वजेशी ॥४॥
राजयोगी दावी निर्वानीचे सुख ।
योगीची तारक ब्रह्मादाता ॥५॥
म्हणो नये गुरुसी मायबाप बंधु ।
आप्त मित्र संबंधु लौकिक हा ॥६॥
माय बाप पतीनव्हती कोण एक ।
निर्वाणि तारक सदगुरुची ॥७॥
नाहीं गुरुवीण देवासीही ब्रह्मा ।
मजावा सप्रेम ब्रह्माभावें ॥८॥
म्हणे जनार्दन ब्रह्मभावे दाठी ।
उघडी भ्रमताटी एकनाथ ॥९॥
जनार्दन स्वामी अभंग – १३
घर्मार्थ काम मोक्ष देह प्राण ।
जीवीत वित्त घन अंतर बाह्मा ॥१॥
सकळही सत्य अर्पावें गुरुसी ।
व्हावें देहें दासी विकोनिया ॥२॥
अर्पावे श्रीगुरुठायी प्रेम अमर्याद ।
जीवें अर्पण बोधें ब्रह्मभावें ॥३॥
देहांदि मी माझें म्हणो नये कांही ।
भावावें सकळही अर्पण हें ॥४॥
महाल मुलुख भोग घनदारा पुत्र ।
मोक्षधर्म अर्थ श्रीगुरुतोचि ॥५॥
करोनय कांही चुकोनी वंचना ।
कलिया पतना होय नेमें ॥६॥
न्हे अनुमव अक्षय ते मुख ।
झालिया वंचक प्राप्त कही ॥७॥
करो नेय गुरु असो तसौ श्रेष्ठ ।
जरी नोहे भेटी दिवस फार ॥८॥
तयापसोनीया न घडे आत्मप्राप्ती ।
प्राप्तीवीण गती ठाके अंती ॥९॥
न वचे सांगतां योग एकवेळा ।
भेटे वेळोवेळां गुरु कराव तोचि ॥१०॥
आनंदाचा सागरु राजयोग एक ।
नसोचि आणिक ब्रह्माडीही ॥११॥
असती येर बहु योग प्राणायाम ।
शिको नये श्रम व्यर्थ तेथें ॥१२॥
न भेटेचि तेणें देहीं तो इश्वर ।
न हींय उद्धार ऐहिकही ॥१३॥
म्हणती भेटे देव राजयोगावीण ।
नाही त्या समान मुढ जगी ॥१४॥
एकचि तारक विश्वा राज योग ।
व्यर्थ लक्ष योग भ्रम सर्व ॥१५॥
म्हणे जनार्दन लाभे सांटी वाटी ।
उघडी भ्रमताटी एकनाथा ॥१६॥
जनार्दन स्वामी अभंग – १४
पाहो नये दोष योगियांचे गुण ।
ब्राह्म आचरण असो कांहीं ॥१॥
योगि तोचि ब्रह्मदेवाचाहि देव ।
नोहेचि मानव मासे जरि ॥२॥
योगीयांचें कांही नकळे देवांही ।
प्राकृत नर कांई कवण तेथें ॥३॥
करी भोगी सर्व परी योगी मुक्त ।
न करी तरी सत्य करी सर्व ॥४॥
योगीयाचे भोग चरित विषय कर्म ।
अवघे परब्रह्मा तारकची ॥५॥
नकरी योगी स्नान संध्या अनुष्ठान ।
स्पर्शे करी पावन ब्रह्मासिही ॥६॥
नलगे अविश्वास शंकेसी कारण ।
योगी तोचि पुर्ण परमात्मा ॥७॥
ताराया जढमुढां श्रीहरीं रुपें योगी ।
अवतरे युगायुगीं आन नाहीं ॥८॥
भुलुनि घनगुणविद्यारुपमदें ।
प्रवर्तति निन्दें भावोनि नर ॥९॥
यालागी करावा आधी बोध जगा ।
प्रशंसावे योगा झटुनि नित्य ॥१०॥
उद्धारावे विश्वातरीच देव प्राप्त ।
लाभे परहित पुण्यें देहीं ॥११॥
म्हणे जनार्दन ब्रह्म पाठींपोटीं ।
उघडी भ्रमताटी एकनाथा ॥१२॥
१५
बोधावें सकळां गुरु प्रेममरें ।
वर्णोनि चरित्रें श्रीगुरुचीं ॥१॥
फिरुनी स्त्रियां नरां विनवावेंसलगी ॥
स्वामीसेवें लागीं अभय दानां ॥२॥
शिबिका न्हाणी गाणीं विंजणे ।
चौफळा करावे मंगळ जयजयकारे ॥३॥
सुवासिनी करेंकुंकुम आरत्या ।
करव्या ब्रह्मादात्या सहस्त्र नित्य ॥४॥
कडुनि सहस्त्र विप्रा तुळसी विल्व पुष्पें ।
अर्पावें साक्षेपें नित्य नेमें ॥५॥
तांबुल विलास भोग वेळों वेळां ।
भोगावावा सोहळा श्रीतारका ॥६॥
पदार्थ शर्करा नवनीत दुग्ध ।
अर्पावा नैवेद्य क्षणोक्षणी ॥७॥
नेमें नित्य तीर्थें प्रसादे पावन ।
करावें विश्व संपुर्ण श्रीगुरुच्या ॥८॥
नसे गुरुवीण तीर्थ देव ब्रह्मा ।
नेणोनि मुढ वर्म शिणती वायां ॥९॥
म्हणे जनार्दन खुणेची गुज गोष्टी ।
उघडी भ्रमताटी एकनाथा ॥१०॥
१६
गुरुसी शरण होतां करिती जे विघ्न ।
पाचती तेदरुण नरकी शेखी ॥१॥
घडती कोटी मात्रा अगम्या गमन ।
गोवघ भक्षण गोमासंदि ॥२॥
कोटी ब्रम्हहत्या पातकें अशेष ।
घदती तया दोष ब्रह्माडीचे ॥३॥
होय दग्ध पुण्य जन्मीचें अनंत ।
जाती नरकी नित्य कुळांसह ॥४॥
नोहे त्या सुटका मग होकां कोणी ।
बोधावें म्हणोनी संती जना ॥५॥
विसरोनि सुख करावें पर्यटण ।
लावावें वळवोन विश्व मार्गा ॥६॥
झटावें अक्षय जगाच्या कल्याणा ।
उपदेशावें जना नारी नरा ॥७॥
ओळखावें देही सकळी आत्मघन ।
होवोनि शरण योगियासी ॥८॥
आलीया करावी सत्य शरण कृपा ।
सकळं ह सोपा राजमार्ग ॥९॥
नसतां पुरुषां योगी अनुराग ।
द्यावा मंत्र योग स्त्रियांशुद्रां ॥१०॥
जरी नोह योग अभ्यास साधन ।
तरी सेवा क्षण सोडों नये ॥११॥
सोशिती काबाड प्रपंच प्रहर आठ ।
मानिती अघम कष्ट गुरुसेवे ॥१२॥
आचारिती दोष पातकें अगाध ।
गुरुसेवे खेद पचती नरकीं ॥१३॥
नव्हे शिष्य जंव नोहे समर्पण ।
पतन गुरुवीण जन्म वायां ॥१४॥
खंडलिया पळ निमिष गुरुसेवा ।
अंतरे तो देवा कल्पवरी ॥१५॥
माता पिता गोत्र कांता पती पुत्र ।
भोगिती अघोर पुर्वजेंशी ॥१६॥
नोहे त्या सुटका मग कल्पातीही ।
जाये कृपा तोही मंत्र वायां ॥१७॥
यालागी करावी नित्य गुरु सेवा ।
देह जीव मावा आर्पोनिया ॥१८॥
करी सेवा नित्य न करी योगाभ्यास ।
लाभे अंती त्यास ब्रह्मपद ॥१९॥
नेणोनि सुरनर प्रेमे ब्रह्मभावें ।
क्षणोक्षणीं आलिंगावें अर्पावा देह ॥२०॥
बैसोनि सन्निध एकांती बाजारी ।
करावी नीच बारी निर्लज्जेशी ॥२१॥
म्हणे जनार्दन उत्तरी कसवटाई ।
उघडी भ्रमताटी एकनाथ ॥२२॥
१७
हेचि गुह्मा ज्ञान सांगितलें मज ।
तेणे मी सहज मीची झालों ॥१॥
हेचि मत्स्येंदासी ज्ञान आदिनाथें ।
कथिलें निवृत्तीनाथें ज्ञानदेवा ॥२॥
तेथुनी हें संती रुढली परंपरा ।
आदिनाथ गुरु संप्रदायीं ॥३॥
सोळा अभंगाचा लिहुनी प्रबंध ।
गोदा तटी सिद्ध संत मेळी ॥४॥
उद्धाराया विश्वा धाडिला पैठणीं ।
उरलें याहोनी नाहीं आतां ॥५॥
येथुनी उपदेश झाला सांग पूर्ण ।
तारक हे ज्ञान सेवो विश्व ॥६॥
म्हणे जनार्दन वचन बांधी गांठीं ।
उघडी भ्रमताटी एकनाथा ॥७॥
१८
नित्य हे अभंग करी तील पठण ।
आचरोनी पुर्ण ऐसे चिजे ॥१॥
होईल तयासी ऐहिक सर्व प्राप्ती ।
लाभेल पै अंती ब्रह्मपद ॥२॥
वर्तोनि करीतां पठण हे अभंग ।
साघेल सहज योग गुरुकृपे ॥३॥
नातळतील तयां दोष काळिकाळ ।
सकळ विद्या कळा होतील प्राप्त ॥४॥
हरतील दैन्यें दुर्धर महा व्याधीं ।
न बाघतील विषादि व्याघ्र सर्प ॥५॥
पळतील विघ्नें भयभुत बाधा ।
नाशेल आपदा क्लेश दुःख ॥६॥
न चलती मंत्र तंत्र उच्चाटण ।
प्रयोग जारण मारणादि ॥७॥
काराग्रह पीडा चुकेल बंधन ।
होईल संतान धन द्रव्य ॥८॥
नोहे त्या देवता क्षोम अवनीज ।
पावेल तो राजसन्मानही ॥९॥
लाभेल घन धान्य होईल विवाह ।
ऐश्वर्य वैभव मोक्ष मुक्ति ॥१०॥
नोहे अग्नि शस्त्रा पासोनिया भय ।
होईल उद्यमी जय वाचा सिद्धि ॥११॥
कळेल भविष्य भूत वर्तमान ।
अवगत ज्ञान ब्रह्माडीचें ॥१२॥
सगुणी आस तरी प्रत्यक्ष दर्शन ।
होईल प्राप्त संपुर्ण ऋद्धिसिद्धी ॥१३॥
जें जें तो इच्छिल होईल तें तें प्राप्त ।
भजेल आज्ञाकित विश्व सर्व ॥१४॥
अथवा रिगोनी अर्थी मने सावधान ।
करी तील नित्यश्रवण भक्तिभावें ॥१५।
होविनि शरण गुरुसी आचरिती तैसेंची ।
होईल फळ प्राप्त तेंचि सर्व तया ॥१६॥
एकचि गुरुशास्त्र ऐसें हेंतारक ।
श्रीगुरुचि एक गुरुकृपा ॥१७॥
म्हणे जनार्दन जपें हेंचि कंठी ।
उघडीं भ्रमताटी एकनाथा ॥१८॥
१९
असती अभंग ताटीचे हे सोळा ।
दोन वर ताळा पुराणि केचे ॥१॥
ऐसें हे अठरा कैवल्याचे दीप ।
कामधेनु कल्पतरु जगीं ॥२॥
उदयलें जनार्दन वस्त्राकाशी ।
ब्रह्म तेजोराशी चिंतामणी ॥३॥
करावेम पठण नित्य हेचि भावें ।
तैसेंचि सेवावें सिदरुसी ॥४॥
गुरुसी शरण व्हावे नायकावी मात ।
माता पिता कांत असो कोणी ॥५॥
लाभावें अक्षय्य तेंचि ब्रह्मसुख ।
पाचावें ऐहिक परत्रही ॥६॥
निंदोत त्यागोंत स्त्रिया पुत्र सखे ।
ढळो नये सुखें त्यागावे ते ॥७॥
सेवावा सतत एकचि तारक ।
जन आशा दुःख नरक मुळ ॥८॥
सकळांसीं हेचि देवोनियां भाक ।
बोमातसो हांक मारोनिया ॥९॥
मुक्तेश्वर म्हणे पती बाप माय ।
श्रीगुरुचि वाय येर सर्व ॥१०॥
जनार्दन स्वामी अभंग समाप्त
शेतमालाची मोफत जाहिरात करण्यासाठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या
ref: transliteral