अभंग गाथा

संत शेख महंमद अभंग

संत शेख महंमद अभंग गाथा एकूण १८

१ – शेखमहंमद 

गोपाळ दुबळा मी लस्करि तुझा ॥ काम क्रोध ब अहंकार तेजी ॥
वीकून खादले ॥ काये अंत पाहातोसि माझा ॥१॥
आसा मनसा त्रुसना कल्पना ॥ चोथी राणीयां पळाल्या ॥
हाचि सद्गुरु साथ मोहोजा । वैकुंठ मुक्ति मोकासा सेख महमद नेघे ॥
मन चरणीं राखावे अरिझा ॥२॥


संत शेख महंमद अभंग – २ – देव – भक्त संबंधपर

चहुं खाणी मधीं हरि धन्य भावां ॥
निच भक्त तुझा सेवा करि ॥१॥
हरि उंच माझें ॥
निच तुझे तत्त्व तेणें वाढे तुझें महिमान ॥ २ ॥
हरि माझी धरणी ति तुझे पर्वत दिसे शोभिवंत ॥
माझ्याने तुझें ॥३॥
हरि तु माझा प्रजन्य ॥
मी तव तुझ्या नद्या ।
सिंधु जाल्या सुध्या मी तु तैस्या ॥४॥
हरि तु माझें राउळ ॥
मी सुधी केरसुणी ।
दरबार झाडुनि पडिलि आसे ॥५॥

हरि तुं माझा तरुवर ।
मी तुझें फुलफळ ॥
सोमति सकळ पत्रे खांद्या । ॥६॥
हरि तुं माझा सिउ ।
मी तवं तुझी शक्ति घरचार ।
हा व्यक्ति करूं दोधें ॥७॥
हरि सेख महमद दोना वाचा ।
भेद चाले आनादि सिध आणति साधु ॥८।
हरि तुं माझी विहीर ।
ती तवं तुझी मोट चालतिल पाट ॥
पीकति मळे ॥९॥
हरि तु माझे आकाश ।
मी तवं तुझा नाद ॥
प्रगट हा शब्द माझ्याने तुझा ॥ १०॥

हरि तुं माझा वोंकार ।
आकारिं मकार ॥
मा चा ची विस्तार ।
माझा तुझा ॥११॥
हरि मी भक्त यारुप ? तुच माझा बाप ।
आयायमने छेप तुझांत माझी ॥ १२ ॥
हरि तुं माझी साकर ।
मी तवं तुझी गोडी ।
ऐसि वाढे प्रौढि ।
माझी तुझी ॥१३॥
हरि तु माझा समुद्र मी तव लवण ।
षड्रसे अन्न सरतें होये ॥१४॥
हरि तूं माझे रत्नः मी तो तुझा कीळ ॥
कोंदनि सुढाळ माझा तुझा ॥१५॥

हरि तु माझे मोती मी तो तुझें पाणी ॥
घट स्थानिं स्थानीं । तुझा माझा ॥१६॥
हरि तुं सरता । माझ्यानें अव्यक्ता ।
निर्गुणी हे वार्ता कोण जाणे ॥१७॥
हरि तुं तेल वाति मी तंव तुझा जयोति ।
नाहिं तरि भ्रांति आंधार खरा ॥ १८ ॥
हरि तूं माझें पोट । मी तंव तुझी कांठि ।
बघ वागवितो कंठिं नाम तुझे ॥१९॥
हरि माझें नासिक मि तव तुझा ।
उस्वास जपमाळ सुरस आर्धउर्ध ॥ २० ॥

हरि येकविस हजर । सा शतें आजप ।
उच्चारी उभय । सेख महंमद ॥२१॥ I
हरि तुं माझा डोळा । मी अंत्र बाहुली ।
शरीर साउलि मीचि तुझी ॥ २२ ॥
हरि तुं माझे सिर मी तुझे पाउले ।
भाविके वंदिले तुझे म्हणउनि ॥२३॥
हरि पाउलें मी जालों ।
चलण आसे तुझें जगी ।
केलें माझें भुषण भक्ति ॥२४॥
हरि पाये नव्हति माझे ।
आवश तुंचि खरे ऐके सर्वेश्वरा ।
द्वैत माझे ॥२५॥

हरि पृथ्वी ळंका ।
मेरू धुरू लिंग ।
हरिसि माझा संग मी नदि जालों ॥२६॥
हरि तुं माझे तीर्थ मि भक्त कापडि ।
भजन आवडि माझें तुझें ॥ २७ ॥
हा नवविधी प्रतिष्ठा भक्ति आळंकार ।
मंडितुंना थोर । निज भक्तांचि ॥२८॥
हरि रवी ससि भक्त आरति उजळि ।
तारा दिप्ती मेळिं। वोवाळितों ॥२९॥
हरि तळीं शेपराजा ।
तो मी भक्त तुझा मानिसिना ।
माझा आभार काहीं ॥ ३० ॥

हरि गरुड रूद्र । कपनी लक्षुमी भवानि ।
पतिव्रताची खाणी । मज भक्तांची ॥३१॥
हरी तुज निर्गुणासि । सेख महमद बोले ।
आईकति भाविक श्रोतेराज ॥३२॥
हरि तूं वेद सिंध ।
ति श्रुतिस्मृति पाच वाचा ति ।
तुझ्याने माझ्या ॥३३॥
हरि तूं माझा परिस । मी तबं लोह धातु ।
माझ्याने तुझी मातु । वाढे पाहे ॥३४॥
हरि तूं माझा वैद। मी दुःखी रोगीस्थ ।
तुं ओषध पावत। मी पथ तुझी ॥३५॥

हरि तुं माझें तप । मी तुझी शांतता ।
दुसरी सायुज्यता । मीच तुझी ॥३६ ॥
हरि तुं कागद नि वरि अक्षरें।
पंडित विचारे मी बागेश्वरी ॥३७॥
हरि तूं अनगर मी तुझें सगर ।
चालति योगींद्र मजवरी ॥३८॥
हरि तुं माझें कांचन मी तुझें भूषण ।
लावेवरि कोंदण माझें तुझें ॥३९॥
हरि तु माझें सर्ग । मीच तुझे दळे ।
दुसरें पड़दाळे मीच तुझे ॥४०॥

हरि वड मी पारवि येका वृक्षा आंगी ।
सेख महमद जगा सांगति टिका ॥४१ ॥
हरि तु जाहाज । मी तुझे आ ले।
बंदर पावले मज भक्ताचे ॥४२॥
हरि तु माझा वारा । मी तुझी वाळवटि ।
मज चकोरां दृष्टि तुज चंद्रासि ॥४३॥ I
हरि तुं भयंक झळय मी त्याची मज ।
तुज दोहिचि प्रीति ऐसि ॥४४॥
हरि तु माझा आत्मा मी तुझी कल्पना ।
ऐके जगजीवना। भक्त हुणे आंगी ॥४५॥

हरि मी तुझे ऑगभूत तु माझ्याने ।
सरता जैसा सिंधु भरता। सरितानि ॥४६॥
हरि तू दिन निशि ॥
तु दादी मी मीसि चवि ।
रस्नेसि सेका वदना ॥४७॥
हरि तु झाकडू । ती सेवक गोडू ।
दोहींचा निवाडू । सेंदित जाला ॥४८॥
हरि वासें तृप्त । मन सेंधेने धाय पोट ।
ऐसा हाच तुष्ट तुझा माझा ॥४९॥
हरि भक्त सोडिना । निर्गुणा तुज खोडा ।
जैसा तो केवडा । केकति पोटिं ॥५०॥

हरि तमी श्रीत । सेख महंमद ।
जैसा चंदन उद । संनिधानें ॥५१॥
हरि धन गरज मि तुझी विद्युल्लता ।
चमकवता । तुझा नधी ॥५२॥
हरि तु माझा तास । मी तुझा नाद ।
अद्वैति वा द्वैत भेद । तुझ्यांत माझा ॥५३॥
हरि सारागंसिं । मी छतिस भार्या ।
स्वर तु आळवाया मुछना माझ्या ॥५४॥
हरि प्रकृतिसी ऐसि हे मीळणी ।
संभ्रम नटणी चौन्यासि लक्ष ॥५५॥

चराचरि हरि साकार मी माया ।
विळा सेविलिया । तुझी तुजमधे ॥५६ ॥
हरि माझा दोरा । मी तुझी बावडी ।
त्रीसूत्रे वोढी । मी भक्त पुंस ॥५७॥
हरि माझी रवी मी भक्त वारडि ।
गुसंळू परवडि महिशांति ॥५८॥
हरि मोणी तुप निज भक्त सेविति ।
ब्रह्मानंदे ढेकुर देति । उब्दोधाचे ॥५९॥
हरि धृतिचा सुगंध । उर्तिचा प्रकासें ।
जेवण समरसे भुक आभुकलि ॥६०॥

हरि तैसि भक्ति आद्वेत खरि ।
विवेकें तत्त्व हेरि । सेख महमद ॥६१॥
हरि गडकोठः मी भक्त कवाडे ।
चरया निवाडें बुरजी माझ्या ॥६२ ॥
हरि माझें कुलुप मी भक्त कीली ।
उघड झाप केली हरि ॥६३॥
याया जाया हरि माझें नासिक मी भक्त उचकी।
सींक जांभई गाजे की । माझी तुझी ॥६४॥
हरि माझे धनुष्य । मी भक्त सीत तिर ।
भातडि चतुर मी भक्त झालों ॥६५॥

हरि भांड़े गोळा ।
भक्त दारुरंजक आगा ।
जगजनक तुं माझा ॥६६ ॥
हरि नवरदेव । मी बासिंगे करवलि ।
वरमाये हळदुलि ति भक्त जालों ॥६७॥
हरि माझा हस्ति । मी भक्त अंबऱ्या ।
घांटा वाजति बऱ्या । मज भक्ताच्या ॥६८॥
हरि कात चुना । मी भक्त पानसुपारि ।
वीडडीया मुखा भीतरि । मी भक्त रंगलों ॥६९॥
हरि बारा आदर ।
भक्त दढावीस आंगोळ्या आंगुष्ठास ।
तुझी माझी गोडि ।॥ ७० ॥

हरि भक्ता भगवंताचा ।
निवाडा खल विदाचा ।
सेख महमदाचा अनुवाद ॥७१॥
हरि शुभ्र वस्त्रे मी भक्त राठसे ।
सोभीवंत दिवे । कुशळता ॥७२॥
हरि माझी धेनु । वासरुं मि भक्त ।
पान्हा तुं द्रवत । मज भक्ता मुखी ॥७३॥
हरि आठरा धान्ये ।
मी भक्त पक्वानें जेवण वालेपणें ।
दोहिचें खरे ॥७४ ॥
हरि माझा नृपति । मी भक्त भद्र ॥
शोभसि चतुर । भक्तिने बरा ॥७५॥

हरि माझा तेजी ॥ मी भक्त खासदार ॥
जीवन तुजवर । मी भक्त जालों ॥७६॥
हरि राज्यधर ॥ ति पालखि भोई ॥
छत्र कर सई ॥ तु कळस वरि ॥७७॥
हरि माझे जंत्र ॥ मी भक्त पीळण्या तारा ॥
वाजवाजवी मी बरा । ति भक्तसवदि ॥७८॥
हरि केळिचें झाड हरि केळांचा घड ॥
रुचि गोडि सुघड ॥ तुझी माझी ॥७९॥
हरि बळिराज सीभ्री चक्रवर्ति ॥

आशपुरी सकति ॥ तुज हरिचि ॥८०॥
हरि श्रीयाळ बळिराज ।
गोहि साक्षी लागी ॥ हरिचंद्र योगी
॥ सेख महंमद ॥८१॥


संत शेख महंमद अभंग – ३

नर देहि पावलास । सद्गुरुताता ॥१॥
चहुं खणीचि दुःखे सांगता आपार ।
येतुसे गहिवर आठवितां ॥छ॥
जड देह तरुवर भलंताचि घालिघाये ।
दुःख करुणा नये । कोण्हांलागी ॥ २ ॥
ज्या जैसें आवडे । तो तैसे तोडी ।
बहुजीव चरफडि । बोलता नये ॥३॥
संचित तुझे कृपे घाये बरे होति ।
मागुते तोडिति पालव नाव ॥४॥
पशुमछ आजा पुत्र । शस्त्रे विदारिती ।
हे दुःखे फजीति । न कळे कोण्हां ॥५॥
सयाति मध्ये वैराकार चाले ।
या दुःखाचे घायाळे । हरि पाहातोसि ॥६॥
हरि म्हणे प्रलब्धे । भोगिति सुखदुःख ।
भक्ति अभक्ति देख । वंदिति निंदिति ॥७॥
हे श्रीवचन ऐकोन । वैरागे आत्मज्ञान।
पाहिले परतोन सेख महमदि ॥८॥


संत शेख महंमद अभंग – ४

तुम्ही कसे सोवळे सांगा जे मज कळे ।
चंदनाचे टिके । व्यर्धे केले १ छ।
पीत्याचे सिश्न मुत्राचे रोजन ।
ते वाटे येऊन पडलेति खोळे ॥छ ।
अशुद्धाचे आळे । विष्टेचे पेटाळे ।
नवमास विटाळे । वाढलें ते ॥२॥
गर्भाचि जाचणी आधोमुखें दुर्घाणी ।
कुंभपाके उकडोनि स्थुळ जाले ॥३॥
ऐसे शरीर वोवळे । ते कायें सोवळे।
भरलि ढिसाळें । अविद्योचि ॥४॥
नश्वर शरीरा । गंधाक्षत करा ।
पाणीनाचे विश्व साधुविण ॥५॥

विषयांचि धार । पापाचे डोंगर ।
विधीचे पसर । नका दाऊं ॥६॥
संताप अनुराग । दोन्ही माहार मांग ।
अहंकारे हा धींग मांडिलासे ॥७॥
कल्पना माहारि वासना चांभारि ।
तुम्हा परोपरिं बाटविती ॥ ८॥
सकाल ज्या रांडा पेंढारणी भांडा ।
त्यानि तुमच्या तोंडा । बोडविले ॥९॥
संकल्प न्हावी । विकल्प दावि मिथ्या देवा देवि ।
नका करूं ॥१०॥

ऐसि अंगसंगें वागविता भींगे ।
का घेतलि सोंगे ब्राह्मणोचि ॥११॥
चंदना लावावे । तरि चंदन तसे व्हावे ।
नाहीतर गळावे । गर्भीहूनि ॥ १२ ॥
हृदयी नाम सडा । प्रेम बोधा गाढा ।
तो ब्राह्मण थोडा । विरळागत ॥१३॥
सेख महंमद साचे । बोलियेले वाचे ।
आचार विप्राचे । भावातळि ॥१४॥


संत शेख महंमद अभंग –

दयाळु म्हणवणें । हरि लाजीरवाणे ।
बिंदि वमनि । सेख महमद ॥१॥
चांगुण श्रीयाळ । वधीला त्याचा बाळ ।
सिरमागे केवळ । म्हणे रडों नका छ।
मलकाई अर्जुन । जा विलें कर चरण ।
नेणसि तुं जीवन । निष्टु धेंडीया ॥२॥
सीधी चक्रवती मला । शस्त्रे विदारिला ।
नाहि करुणा तुला । ससाणा हासि ॥३॥
स्त्री पुत्राच्या हातें । कर्वतविलें चंद्र हास्या ।
येता अनुपाते । धड नेघसि ॥४॥
प्रल्हाद आवडला कस्यप विदारिला ।
न भजे जाणोन केला घात त्याचा ॥५॥

सिता भक्ते नेली त्याचि त्वां शांति केली ।
हे नव्हेस खोलि परमार्थाचि ॥६॥
कोंस मामा शरिरी स्वगे तले उरि ।
तुं घातक क्षेत्र बोकाचे न्याय ॥७॥
सुदाम्याचे घेऊन बळिस मागसि दान ।
दृपदि पासि वाण । घेऊन उदार ॥८॥
कर्ण परिक्षिती अक्रूर । उद्धव हरिश्चंद्र ।
रखुमांगद कबीर त्या कसून पाहिले ॥९॥
सांगता भक्त कोडि वाढेल बहुत प्रौढी ।

नामदेव आवडि मांडिली येथे ॥१०॥
देव भक्तांचा गता भक्त उदार दाता ।
लाज नये आनंता उदार म्हणवितां ॥११॥
सुखाचा मागता हा सळितो नाना परि ।
धन्य भक्ताचे निर्धारि जाण होतसे ॥१२॥
स्वसुपति वरि लोळण ॥ सळत्या लासळण ।
धर्म नष्ट लक्षणे श्री गोपाळा ठाई ॥१३॥
हरि सिवकारि तत्पर । भक्ता मुक्ति उधार ।
ऐसा लंड सिरजोर । दुसरा नाही ॥१४॥
ऐसा अव्यक्त खाडिल । भक्ति केला आमोल।
रोख महमदिं सखोल । वर्णिला वाचे ॥१५॥


संत शेख महंमद अभंग –

निसंग निलज होई वो धांगडि ॥
मग तुज लागेल गोडि परब्रह्मिचि ॥१॥
या लोकीकाची लाज धरसिल धमकटि (?) ॥
तरि तुज जगजेठि नातुडति ॥ २ ॥
नश्वर शरीर याचि काये लाज ॥
साधुनि घेई काज ॥ जो जिवित्व आहे ॥३॥
देह विठलाचें झाड : उचिष्ट वोवळें ॥
ते काय सोवळे होईल तुज ॥४॥
सेख महमद म्हणे प्रकृति साजणी ॥
भाव धरूनि मनि जाविद्या सोडा ॥५॥


संत शेख महंमद अभंग –

निट बसा डोळे पुसा ।
घातला पवसा झोपेने ॥१॥
कर्णबिळि ॥ वैसलि टाळि ॥
नाम नव्हाळि । ऐको नेंदि ॥ २ ॥
कानि बोंब मारा सावद करा ।
नाम उपचारा सेख महमद म्हणणे ॥३॥


संत शेख महंमद अभंग –

प्रतिमा दुलिता ॥ सळति देवरुसि ॥
गवणे केलं दासि तेतिस कोडि ॥१॥ ॥ छ ॥
तेव्हा काय सामर्थ्य जाहालें होते त्याचे ॥
बंद राक्सचि फोड वेतना ॥छ ।
सिध्याचि मि जी म्हणविले सेळिने ॥
गावाप गजा डोईवीर आणिली ॥२॥
तैसे समर्था सद्गुरुचे ॥ व्होवे धीर आतरिं ॥
देवते भुते फाडितना ॥३॥
पाहा रावेस राबणें । पुंजीले शुळपाणी ॥
सिर कमळे पाहुनि आराधीले ॥४॥
पाखला जे देणें सांगति प्रसिद्ध ॥
सेख महमद पुरानविद ॥५॥


संत शेख महंमद अभंग – ९ – संतपर

ब्रह्मीहून चंचले । त्या प्रयत्न न चले ।
मुरडिती सिनले । साधुसंत ॥१॥
मुरडितां मुरडे नाधेति त्या आघाटि ।
पाडति आव्हांटि । चौऱ्यासिस ॥२॥
धरूनिया बिज उगवति पडति ।
जन्म मरण सुति । फेरा त्यांला ॥३॥
भाजीलीयां बिज मग वे उगवेना ।
म्हणोनि धरि जना साधु संग ॥४॥
सदगुरुचे संगति होय ब्रह्म प्राप्ति ।
सेख महमद पाई प्रीति पद्मनामा ॥५॥


संत शेख महंमद अभंग – १०

भयें आला के फकीर ॥
छाडी दुनियाकी फीकीर ॥१॥
आला नबिके तवकलि ॥
चिज न्या मत आवेलि ॥२॥
जालम नजीक जावे ॥
नसियत नतिज्या वावे ॥३॥
कली मारुचे पचे पीर ॥
हजरत मीरां साचे ॥४॥
सेख महमद मस्कूल ॥
लोलग्या बालेंबाल ॥५॥


संत शेख महंमद अभंग – ११

भोगा जाभीगा वेगळा ।
हरि जैसा चंद जप ॥१॥
मद्य मांस भक्षीति ।
हरि भोक्ता म्हणति ॥२॥
रांड पोर मेल्या वीर ।
रडतिल परोपरि ॥३॥
चिलो देऊनि भोक्ता ईश्वर ।
बोले श्री ळ सब्जधिर ॥४॥
खातां आनंदती आ टिरि ।
तरी भोगता श्रीहरि ॥५॥
ऐसे जाल्या हरि भक्ता म्हणा ।
सेख महमद दावि निजखुणा ॥६॥


संत शेख महंमद अभंग – १२ – निसर्गपर

मज जैसा निकामि नाहि वो दुसरा ।
आलो भुमिभार ॥१॥
भुमिभार म्हणउ हेत म दिक्षा ।
नयेचि मि लक्षा ।
योगीयां हे टिक पाहता बहुं थोर दिसे ।
परब्रह्म आसे आलक्षपे ॥२॥
रज लीन होईन । के हिन पीके होति गहन ।
रज मृत्तिकेने ॥३॥
सेक महमद आभांस न ।
भासे जनामध्ये आसे विजनपणे ॥४॥


संत शेख महंमद अभंग – १३ – गुरुमहात्म्यपर

मरण मारून मरा । भाई हो मरण मारून मरा ।
सद्गुरुस्वामि सेउनि । आत्महित आधी करा ॥ १ ॥
कष्टि होऊनि कुडि पडे बापुडि ।
जिव हा पुट करि वेरझारा ॥छ ॥
मरतां कोण्ही न दिसे ।
जे सारा हाट गाडग्याचा फेरा ॥२॥
स्वप्निचि भावना । तैसे जीवीत्व जाणा ।
जना नको सो डंब अहंकारा ।
येम जेव्हां जीवा करिल यातना ।
तेव्हां काकुलति येसि गव्हारा ॥३॥
विजवट गहन । तैसे जन्म मरण ।
देहि या पाट जिवनि नितनोवरा ।
सदगुरु वचने मरण मारुनि उरा ।
सेख महमद विनिवितो योगेश्वरा ॥४॥


संत शेख महंमद अभंग – १४ – कीर्तनपर

वैराग्य करा कथा । सांडुन डंबिक तया ।
स श्रोत्याचि बथा । हरेल तेणे ॥१॥
प्रेमे नेघे नाम गोडि ।
शब्द संस्कारें बडबडि न ।
होउनिया मोडि । या डोळ्यातें ॥ २ ॥
डोळे माळेखोवे लाजे ।
पाहाति विषयांचे राजे ।
तों तो कल्पना माजे । वासने संगे ॥३॥
मन दाहिवाटा । भरे चेतनेचा ताठा ।
ऐसा व्यापार हा खोटा हरिकथेमधी ॥४॥
सेख महमद मुसलमान ।
बोले हरि जोडेसि तुम्ही मांडुनियां ।
अवगुण प्रेमें कथा करा ॥५॥


संत शेख महंमद अभंग – १५ – श्रोत्यांना विनवणी

श्रोत्यांला आर्दास । करितो उदास ।
धरावा विस्वास हरिचे चरणी ॥१॥ छ ॥
करितो विनवणी समस्ता लागुनि ।
भाव धरूनि मनि अविद्या सांडा ॥छ॥
धरूनिया निर्धार सेवा हो ।
सद्गुरु तेणे भवसागरू तराला सति ॥२॥
आह ष्टा निंदा । सांडा विषय धंदा ।
मग तुम्ही गोविंदा ॥ आवडाल ॥३॥
सेख महंमदास माना उपदेश ।
सुरत्यांला रहिरास हाटकितसे ॥४॥


संत शेख महंमद अभंग – १६ – आत्माज्ञानपर

सांडि सांडि रे गोवळ्या नाना मते ॥
जेधे मी माजी हारपे ॥ लक्ष ते ॥१॥
आष्टधा प्रकृति तेणें जायां रे ॥
कर्ण छेदुनि भगवि मुद्रा वाया रे ॥२॥
सेवी सद्गुरु चर लवलाह्यारे ॥
तेणे सर्वहि अभ्यंतर पडे ठाया रे ॥३॥
येक म्हणति राखोना दाद भेद ।
जया नाहि आत्मज्ञान मुढ आंध ॥४॥
ये धरुनियां वेश मति मंद ॥
मंत्र दैवत संकल्प भव छेउ ॥५॥
सांडि भ्रांति उभ्रांति दत्तमानसि ।
करि चिंतन येकाग्र आहिर्णीसि ॥६॥
सेख महमद बोले स्वरूपेसि ॥
जगी अवतार घेतला मल वोसि ॥७॥
चौयासि भ्रमत जालो कासाविस ॥८॥


संत शेख महंमद अभंग – १७

संताचा मारग लौकीकावेगळा ।
ते लाधली कळा सेख महमदा ॥ १॥
सविल वधिति गाई । म्हैसि हाले ।
येणे ते छेडिले काम क्रोध कल्पना ॥छ।
सविल करिति सोपाटा साठिं ।
येणे केल्या कोटि । महापुण्याच्या ॥२॥
सविल करिति विस्वासघात ।
याचि वरि नेत । परउपकारि ॥३॥
सविल ते खाति मद्य मांस सरा।
जाति येमपुरा येमाच्या जाचे ॥४॥
सिदि भांग भुर्का सेविति सविल ।
यारूचे आमोल निज नामाचा ॥ ५ ॥

सविल करिति सेत कुळवाडी ।
हा वाचे आवडी ॥ निरावलंब ॥६॥
सविला लागाल गुरु गोडिचा छंद ।
याचे वाचे हरिकथेचा ॥७॥
सविला आवडे लुडकि पोस्त ।
याला नित्य नित्य वीटेल चर्चा ॥८॥
सविला आवडे कुटाळि हा ।
भजे गोविंदा अहिर्निस ॥९॥
सेख महमद भाविकां प्रबोधा ।
अभाविका छउ अविद्येचा ॥१०॥

सविला आवडे धनधान्य संवति ।
याला सदा प्रीति साधुसंताची ॥११॥
सविल विछीती गाई म्हसियासी ।
विधी मुक्तीयासि कस दासि जाल्या ॥१२॥
सविले कष्टति तीर्थे व्रते सद्गुरुकृपे ।
सोपे वैकुंठ यासि ॥१३॥
सविला आवडे लोकांसि भांडणे ।
यांच्या घेतलि मने । तत्वकवि ॥१४॥
सविला आवडे अबोला धरणे ।
हा निवंतपणे निशब्दि बोध ॥१५॥

सविला आवडे चोरि मारि पाप ।
याला भाउभय परावाचेचि ॥१६॥
लोकाला (सविला) आवडे वहाड करणे ॥
सायोग्यता येणे धरीयेली ॥१७॥
योगींद्र इच्छिति नानाविध कर्म ।
यालागी परब्रह्म आंगे सदा ॥१८॥
अज्ञानाचि तपे ॥ अभिमानचि जे ।
द्वैत तेचि काजे ॥ शुभाशुभ ॥१९॥
त्रिगुण कल्पीत संविलांचे चित्त ।
ममत्वें विरक्त सेख महमद ॥२०॥

सविला आविडति पालख्या घोडे ।
छत्र्या क्षमा दया बर्‍या आवडे शांति ॥२१॥
सविल मांडति भुरासिला ॥
निजपउ याला मिरासि जाली ॥२२॥
भाटानि वर्णिल्या मुढां ॥
याला वर्णीत खरें । च्याही देव ॥२३॥
सविला मायबाप दोन्ही आवडति ।
याला भावभक्ति माये बाप ॥२४॥
विषयें अबळासि सविलांचे नेत्र ।
याचे ते पाव (?) पाहति संता ॥२५॥

सविलचि कान कुटाळि ऐकति ।
याचे चित्त देति कीर्तनासि ॥२६॥
सविल करि नाना सोंग तोरा ।
याचा वेष बरा येक वर्ष ॥२७॥
येकाचे अनेक होति केल्याबरि ।
म्हणउनि त्याला सरि प्रळयाचि ॥२८॥
अष्टधा प्रकृति विहावी जोडिलेव ।
हरिहर ब्रह्मादिकां । हा लववेना ॥२९॥
सेख महमद या नांव ठाकले ।
भक्तिला धरिले भाविकांचे ॥३०॥

चौसि लक्ष नावे । येके येके देही ।
उपनावा नाही गणीत अभक्तां ॥३१॥
सविल पीडले यानि नावे ऐसे ।
हायाति नामी असे ॥ आनाम आकुळि ॥३२॥
सविला आवडे मी तुं पण भूषण ।
कल्पनेविण मन आमन याचे ॥३३॥
आपलाल्या मते सविल फुंदति ।
सविल हासति रूपदर्शन न्याये ॥३४॥
सविला चटि हास्य विलास ।
वोजा जाणे खुणा जा ब्रह्मज्ञानि ॥३५॥

केकतिच्या झाडा कांटीयांचि ।
प्रबळता त्यात निवजता सुगंध केवडा ॥३६॥
तेवि अनेक दृष्टि । साधु निवजति ।
त्याचे गुण न धरिति नष्ट दुष्ट काटे ॥३७॥
सविल तोडिति साधु संतांचे मन ।
याने समाधान भलत्याचे केले ॥३८॥
नष्टा दष्टा जाये मोलेंविण वाया ।
कांटे करिति नास शरिराचा ॥३९॥
सेख महमद नष्टा दंष्टां बोधी ।
धरितिल संधी भाविक भोळे ॥४०॥

सविल पाहाति दोनि डोळियांनी ।
हा आनंत लोचनिं अनेक पाहे ॥४१॥
सविल विछिति लेहिले कागद हा ।
वाचि नंद कागद कोरे ॥४२ ॥
सविल भजति षमिक बुथिले ।
हा भजे परमार्थाने नाहिं वाम बुद्धि ॥४३॥
सविल पुरविति सोयेऱ्यांच्या कोड ।
याला बहु वेड साधुसंतांचे ॥४४॥
सविल एक देसि पुजिति देवता ।
हा पुजि भगता ॥ अनिवार ॥४५॥

सविल वार करि येता आता पीडिति ।
देव घेव करिति । पाप पुन्याचे ॥४६॥
सविल सोसिति गर्भ येमपुरि ॥
जाया गमन थोरि । जाळिली याने ॥४७॥
गरुड टके चिडीया सविलां पताका ।
दिंडीया तरुवर ऐक मताका यास ॥४८॥
तिवाल्या जमखाने सविला आवडति ।
यानि महिमा स्थिति । तिवासि थोरी ॥४९॥
सविलाचि तीर्थे पाण्याने वाहाति ।
या विवेक शांति सत्रावि वेणी ॥५० ॥

दगडाचे देउळे आवडति जना ।
याचे मना आणा ब्रह्मांड देउळे ॥५१॥
सविला आवति मंडत रखत ।
याला थोर शोभत मंडप नभः ॥५२ ॥
प्रतिमा देऊळे सविला आवडति ।
याचा देव सति । अखंड न खंडे ॥५३॥
सविला आवडति कांसिवाच्या घांटा ।
याचा गर्ज मोटा अनुहाते ॥५४॥
निकट निज जा सेख महमदाचि ।
मानली संता त्याचि प्रेमाने तत्वभळविता ॥५५॥


संत शेख महंमद अभंग – १८

हुदंई वंदखान जत सत कवाडे ।
कोंडिला केवाडे । अव्यक्त व्यक्तिने ॥१॥
सद्गुरु मन तुष्टमान जाले ।
मग ते दोन्ही आले । वीक वैराग्य छ ।
भाव माझा घोडा भक्ति मा विळ ।
तस्कर गोपाळ । पचिके केले ॥२॥
वो चा हात खोडा विज्ञानाची खिटि।
परमा बळकटि । गोविंदा केलि ॥३॥
निजवृत्तिच्या बेड्या प्रेमाचे चामोटे ।
पिछोंडे गोमटे स्यांत्तिने वांधले ॥४॥
धर्म दया विरक्ति गळा तो रब ।
साजे आकलिना बोजे । हरित्वाने ॥५॥

हा झोड कळला पुंडलिका राया ।
वेळी लगवया टाकिलि विट ॥६॥
मागे मक्त सळिल हे श्रवण जाले ।
हरिकारा ग्रहि दिल्हे सेख महमदि ॥७॥
भक्ति लालुचि पा णाचा जाला ।
हाटे उभा आठविस युगे ॥८॥
भावाचा लोलिप्त अव्यक्त क्ति ।
येतो जड देह धरितो प्रतिमेचे ॥९॥
ऐकत उभा द्वारि भाव भक्ति आसे ।
निर्धार त्या ऐसे आणीक ये नाहि ॥१०॥

भोळि देखोनि सिंपिया नाग्याने ।
वाटि दुध त्याचि प्रीति सेवि ॥११॥
नर नरि ऐसी जना दिसे थोडी ।
याचा न कळे ? पथर कोण्हा ॥१२॥
याचेच उचिष्ट महार सेवि त्या सवे ।
नित जेवि पांडुरंग ॥१३॥
सुभासुभ नेणे विस्वाचा जनिता ।
सांपडिला सेखमहमदिं ॥१४॥


हे पण वाचा: संत  शेख महंमद यांची  संपूर्ण माहिती 


शेतमालाची मोफत जाहिरात करण्यासाठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या