संत जनाबाई अभंग – जातेंपर

संत जनाबाई अभंग – जातेंपर

२२६
जात्यावरील गीतासी दळणमि गोविंदासी।।१।।
देह बुद्धीचे वैरण बरवा दाणा हो निसून||२|
नामाचा हो कोळी । गुरुआज्ञेतें मी पाळीं ॥३॥
मज भरंवसा नाम्याचा गजर दासी जनीचा ||४|

२२७
सुंदर माझें जातें गे फिरे बहुतेक ओव्या गाऊं कौतुके तूं मेरे बा विठ्ठला ।।१।।
जीवशिव दोनी खुंटे गे प्रपंचाचे नेटें गे। लावुनी पांचीं बोटें गे तूं येरे बा विठ्ठला ।। २ ।।
सासु आणि सासरा दीर तो तिसरा । ओव्या गाऊं भ्रतारा, तू येरे बा विठ्ठला ||३||
बारा सोळा गडणी, अवघ्या कामिनी ओव्या गाऊं बसूनि तूं येरे बा विठ्ठला ।।४।।
प्रपंचदळण दळिलें पीठ भरिलें । सासुपुढे ठेविलें तूं येरे बा विठ्ठला ॥५॥
सत्त्वाचें आधण ठेविलें पुण्य वैरिलें पाप तें उतूं गेलें तूं येरे बा विठ्ठला ॥ ६ ॥
जनी जातें गाइल कीर्त राहिल। थोडासा लाभ होईल तूं पर बाबा ||७||

२२८
वैराग्य अभिमानें फिरविलें जातें म्हणवोनि यातें भाव खुंटा ।।१।।
संचित मातृका वैरण घातली। अव्यक्ति दळिलीं व्यक्ताव्यक्त॥२॥
नामरूपा आदि दळियेलें सर्व पीठ भरी देव पंढरीचा ||३||
नवल हा देव चैसला दळणीं नाहीं केली जनी नामयाची ॥४॥


शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या