संत गोणाई अभंग

संत गोणाई अभंग

संत गोणाई 


नवमासवरी म्यां वाहिलास उदरीं। आस केली थोरी होसी म्हणोनी ||१||
शेखीं त्वां रे नाम्या ऐसें काय केलें । वनीं मोकलिलें निरंजनीं ||२||
कारे नामदेवा जालासी निष्ठुर न बोलसी उत्तर मजसि कांहीं।।३।।
सज्जन सोयरीं सांडियेली लाज। जालासि निर्लज एकसरा||४||
प्रेमपिसें तुज लाविले विठ्ठलें। रूप दावुनि केलें तद्रूप तुज ॥५॥
यासि सेविलिया कैंची बाप माय सर्व हाचि होय सर्वांठायीं ॥६॥
ऐसियाचा संग धरियला तुवां । परिणाम अनुभवा जाणशील ॥७॥
संत सनकादिकां लावियेलें वेधीं । तींहीं संसार उपाधि सांडियेली ॥८॥
विठ्ठल विठ्ठल हेंचि पैं चिंतन। विटेसहित चरण धरियेले।।९।।
ऐसें शिकवितां नाम्याचें न मोहरे चित्त पाहतसे तटस्थ तन्मय दृष्टी ॥ १०॥
नामा म्हणे माते वायां कां कष्टसी । विठोबा जीवेंसि जडला जाण ।।११।।



माता म्हणे नामा राऊळाशी खेळतां । तुज कोण्या दैवता ओडियलें।।१।।
लाजिरवाणें नाम्या तुवां केलें जिणें हांसती पिशुने देशोदेशीं ।। २ ।।
सोडि देवपिसें नको करूं ऐसें व घर कैसें बुडविसी ||३||
जन्मा येऊनियां पराक्रम करीं । कां होसी संसारीं भूमिभार ।।४।।
सुदैवाची लेंकरें वर्तताति कैसीं तूं मज जालासि कुळक्षय ॥५॥
कैसी तुज नाहीं लौकिकाची लाज हेंचि थोर मज नवल वाटे ||६||
अभिमान अहंता सांडुनियां जगीं । नाचतोसि रंगीं गीत गातां ||७||
तुजविण लोक अज्ञान नसती। क्षण न विसंबती मायबापा ।।८।।
पुत्र आणि कलत्र घराची विपत्ति। तुज अभाग्याचे चित्त पंढरीनाथ ॥९॥
यातें भजती त्याचें न उरेचि कांहीं। हाचि देव पाहीं घरघेणा ||१०||
जयाचें खुंटे तो लागे याच्या पंथें। तुजसि शिकवितें म्हणोनियां ।। ११।।
गोणाई म्हणे नाम्या हैं नव्हे में भलें। विठोबानें केलें आपणा ऐसें ।। १२ ।।



कापड घेऊनी जाय बाजारासी गोणाई नाम्यासी शिकवितसे ||१||
लोकांचे हे पुत्र संसार करिती। आमुची फजिती केली नाम्या ||२||
नाम्या विठोबाचा संग नव्हे बरा गेंद हा खरा गलाकाटू ||३||
याचे संगतीनें संसार जाळाया भोपळा हा घ्यावा भीक मागूं ||४||
नको संग धरूं नाम्या ऐक गोष्टी । गोणाई. हनुवटी धरूनी सांगे ॥५॥



गोणाई म्हणे नाम्या राहिलासी उदरीं । तेंहुनि मी करीं आस तुझी ||१||
उपजलासि तैं मज जाला संतोष आनंद उल्हास वाटे जीवां ||२||
गणगोतामजी के बारे नांव पंढरीचा देव प्रसन्न केला ||३।।
रात्रंदिवस लेखी अंघोळीवरी तूं मज संसारी होसी म्हणोनि ।। ४ ।।
तंब तुम अवचित उपजली बुद्धी भोपळा हा खांदी आवडला ॥५॥
हातीं टाळ घेऊनी करिसी आळवणी घागरिया चरणीं बांधोनियां ॥ ६ ॥
सांडोनि घर-दार आपुला संसार नाचतां विचार न धरिसी ||७||
नव्हें तें करितां कोण असे वारिता। परी त्वां आपल्या हिता प्रवर्तावें ॥८॥
मी एक आहे तंव करीन तळमळ मग तुझा सांभाळ करील कोण॥९॥
यानी नाहीं संसार हा बोल निर्धार सत्य माझा ।।१०।।
कोण्या गुर्गे तुवां घेतलें धर गोणाई म्हणे करणे फळा आलें ||११||



आपणा वेगळा कशाला निवडिसी कां मज दवडिसी सांग नाम्या ॥१॥
बरवें पुत्रपण जालासी । उत्तीर्ण। आतां अभिमान पाहें माझा ॥२॥
तुज नेल्यावीण नवजाय येथून पंढरी गिळीन विठोबासहित ॥३॥
माझेंसी लेकरूं मज आहे वेव्हारू। मज आहे निर्धारू विठोबासी ।।४।।
हा दानवांतें छळी आपणा म्हणवी बळी। तें मजजवळी न चले कांहीं ॥५॥
विटेसहित चरणीं बांधिन आपुला गळा क्षण जीवा वेगळा जाऊं नेदी ॥६॥
आसनीं शयनी न विसंबे भोजनी पालिन मुरडोनि हृदयामाजी ||७||
या देहाचा संकल्प आले करोन। घातलेंसे पाणी घरादारां ॥८॥
हा त्रिभुवनीं समर्थ मी असें जाणत पाहेन पुरुषार्थ आजी याचा ||९||
अठ्ठाविस युर्गे भरली तथा बोला धरोनि उभा केला पुंडलिकें ।।१०।।
गोणाई म्हणे देवा होई कां शहाणा वायां कां परधना धरिसी लोभु । । ११ ।।



वडील वडील आमुची बोलतील गोष्टी परी तुज ऐसा सुटी देव नाहीं।।१।।
दर्शना आलिया पाडिसी आव्हाटा मन मारूनी चोहाटा भुलविसी तूं ||२||
ऐसा कैसा कोणें केला देव आमुच्या जाणिवा खेच आणिवेला ||३||
माझे बाळ तुझ्या दर्शनास आलें । तें त्वां भुलविलें केशिराजा ||४||
रात्रिदिवस तुझ्या नामाचा रे छंदु । गोविंद गोविंद म्हणतसे ।।५।।
तान्ह भूक विसरला पिसाट पैं जाला। नोळखे मजला काय करूं ॥ ६॥
परतोनि संसाराची सांडियेली आस दिसतो उदास सर्वापरी ।।७॥
लोकांचीं लेंकुरें कां गा चाळविसी । आपणया ऐसें करसी भलत्यासी।।८।।
आणिक असतां नाश वेगळा थोर मग माझा विचार कळतां तुज||९||
तुम एक धर्म पुंडलिक आहे जेणें जहविले पाय विटेवरी ।।१०।।
याहुनी आणिक अधिक पावसी। आम्हां दुबळ्यासी कष्टवितां ।। ११ ।।
मार्गे पुढे तुज ऐसेंचि फावलें । तें तंव न चले मजसी कांहीं ।। १२ ।।
जीव मी देईन कां नामा नेईन। नांव मी करिन गोतामाजीं ।।१३।।
आतां बरवें विचारी अगा ये श्रीहरी । माझा नामा करीं मज आधीन ।। १४ ।।
नाहीं तरी जीवित्व वेंचिन तुझ्या पायीं । विनविते गोणाई केशिराजा ।। १५ ।।



अगा ये विठोबा पाहे मजकडे । कां गा केलें वेडें बाळ माझें ।। १।।
तुझें काय खादलें त्वां काय दिधलें । भलें दाखविलें देवपण||२||
आम्हीं म्हणूं तूं रे कृपालू अससी आतां तूं कळलासि पंढरिराया।।३।।
कां देवपण आपुले भोगू जाणावें भक्त सुख द्यावें हेळामात्र ||४||
देव देव होऊनियां अपेश का प्यावें। माझें कां बिघडावें एकुलतें बाळ ||५||
तूं कैसारे देव या देशावेगळा बांधितें तुझा गळा परि संतां भ्यालें ॥६॥
तुझी करणी अवघी आम्हां ठाउकीच आहे। बोलोनियां काय हलकट व्हावें।।७।।
जाणोनि पुंडलिक तुझी न पाहेचि वास। तूं भला नव्हेस घरघेणा।।८।।
तो बैस पैं न म्हणे तुज याचकाकरणें। जडसी जीवेंप्राणें सात्विकभावें ॥९॥
झणीं तूं आपुला करिसी बोमाटा मग येईल वीट लोकाचारी ॥ १०॥
थोरपणें नामा करी मज आधीन गोणाई म्हणे चरण धरिन तुझे ।।११।।



माझा नामा जंव नांवरूपा आला जंब म्हणों लागला घरदार ||१||
तब कैसें विघ्न उठिलें गे माये। नामा पंढरिरायें भुलविला ||२||
सांग बा विठ्ठला म्यां काय केलें । नामया कां मुलविलें कवण्या गुणें ॥३॥
आम्ही गा सिंपिये अनायें में दीनें करूं सिवने टिपणें पोट भरूं।।४।।
त्यासी देवा तुवां आणियेला क्षयो। कैंचा आम्हां देवो निर्मिलासी ॥५॥
असतां चराचर न बुडतां हे सृष्टी कां गा घेसी पाठी दुर्बळीची ॥६॥
एक बाळ माझें धरिली त्याची आस । त्यां कैसी निराश मांडियेली ||७||
दिसां मासां गर्म जाणोनियां पोटीं । त्याची आस मोठी करिती लोक।।८।।
एवढा माझा नामा कैसेन विसरेन। देई कृपादान दुर्बळासी ॥९॥
तूं अनाथा गोसावी दीनाचा कैवारी । तें ब्रीद श्रीहरी काय जालें ||१०||
बिघडलें पाडस करी एके ठायीं । विनवितें गोणाई केशिराजा ।।११।।



बुडविली क्रिया बुडविलें कर्म बुडविला धर्म पाहा येणें ।।१।।
तुझिया नामाचें लागलेसें पिसें । असोनि न दिसे लोकाचारीं।।२॥
नेणों काय कळे तुवां वागविला संबंध तुटला मज नाम्याचा॥३॥
बुडविला आचार बुडविला विचार बुडविला संसार कुळासहित ।।४।।
आपुलें पारिखें सर्वथा सारिखें नेणों कवणें सुखें वेडावला ॥५॥
बुडविला मोहों बुडविली ममता बुडविली अहंता मीतूंपण ।।६।।
हा नेणें वेव्हार कां इंद्रियांचें सुख अखंड याचें लक्ष तुझे पायीं।।७।।
बुडविली कल्पना समूळ वासना। बुडविली सेवा त्रिविध कैसी ॥८॥
हांसे नाचे प्रेमें फुंदतु । अहर्निशीं गातु नाम तुझें ।।९।।
असोनि नसता केला ये संसारीं। म्यां वाहिला उदरीं तैसा नाहीं ।।१०।।
गोणाई म्हणे देवा त्वां केली निरास चाळविलें उदास बाळ माझें ।। ११ ।।


१०
ऐके गोणाई म्हणे केशिराज सदा अरज तुझें नामदेवा ।।१।।
संसारादि यासी नायडेचि कांहीं मिठीच वो पायीं घातलीसे ||२||
नेणों याच्या जीवें घेतलेसें कांही लोळणींच पायीं पातलिये ॥३॥
पुमे वो जीवी काय काय आवडे उमगोनि कोर्डे नेई पासी ॥४॥
देतां कांही न मागे नसतां कांहीं नेथे गुज न सांगें अंतरीचें ॥५॥
जन्मोनि सांकडे घातलें वो कैसे गिलि मज ऐसें वाटतसे ||६||
मी भावासि भुललों सांपडलों वाचे हातीं करिल काय अंतीं न कहीं ||७||
एक वेळ मज सोडवीं या पासोनी। दे कां मज लागोनि जीवदान ॥८॥
माझिये पे बोले मज गोविलें जातें आगिलें अनाथ म्हणोनि ||९||
अंगोळिये धरितां खांदा बोगिये आतां माझें केलें न चले कांहीं ।।१०।।
तूं आपुलिया मनीं विचारूनि पाही । नामा आपुला नेई आवडता ।।११।।
माय लेक दोघे साम्राज्य करा । घ्यावें धरणीवरी सुख याचें ||१२||
कठिण बोल तुझे बहूसाळ ऐकिले। नाहीं त्वां गे पाहिलें मागेंपुढे ।।१३।।
आतां तुझी कैसी झांकोळिली माया। मज करिसी वायां इष्ट तूं गे ||१४||
ऐसें देवाचें बोलणें ऐकोनि उदास । नाम्या जाले क्लेश तयेवेळीं ।।१५।।
नामा म्हणे देवा ऐसे पैसों घडे सुशीहि पे बुडे तरी न सोडी तुज ।।१६।।


११
विश्वजनमोहना कपटिया नारायणा । काय देवपणा मिरवितोसी ।।१।।
दर्शना आलिया हृदयीं संचरसी। देहभाव घेसी हिरोनियां ।।२।।
या विश्वावेगळे नवल तुझें करणें सांगावें गाऱ्हाणे कवणालागीं ||३||
सर्वांगें सुंदर परी हृदयें कठोर। नेणसी जिव्हार मज दुर्बळीचें ||४||
मज अनाथाचें बाळ वेधोनि मोहिलें। बहुत दुःख झालें सांगों कोणा ॥ ५॥
कासया पितृभक्ति पुंडलिकें केली विवसी आणिली पंढरीसी ।।६॥
माय दुखवुनी मोहिसी बाळकें। देवपण निकै कैसें तुझें ।।७॥
यातें अनुसरल्या कैंची बाप माय नाठवेची सोय संसाराची ॥१८॥
ऐसियानें संग धरिला तुझा देवा । प्रत्यक्ष अनुभवा आलें मज ।।९।।
आतां माझिया जीवीचें जाणसी तें गुज तरी काई तुज उणें होते ।।१०।।
माझा नामा लावीं संसाराचे सोई विनविते गोनाई केशवा ।।११।।


१२
बहुत दिवस भरले पैं गोपाळा । अगा ये विठ्ठला कवण न ये ।।१।।
नामा माझा वेग देई माझ्या हाती जाऊं दे परती अनाथनाथा ॥२॥
खाऊं जेऊं तुज असोस पैं देऊं । कीर्ति तुझी गाऊं जगामाजीं ॥३॥
तुम काय जाणें ब्रह्मांडनायका नव्हेसी मजसारिखा एकदेशी ।।४।।
अनंत ब्रह्मांडें क्षणें घडामोडीसी कां मज दुर्बळीसी कष्टाविलें ।।५।।
तुज दुजेपणाचा सहज आला वीट। तूं तंव एकट एकलाची।।६।।
ऐसी कीर्ति वेद वर्णिती पुराणें । तें कां लाजिरवाणें करिसी देवा ||७||
तूं कृपेचा कोंवळा म्हणति विश्वजन । त्या तुझें निर्वाण कळलें नाहीं ॥ ८ ॥
मैंद मुद्रा धरणें गळां तुळसीमाळा । निवटितोसि गळा न कळतां ।।९।।
आतां आपुला भ्रमु राखे तो शहाणा झर्णे माझ्या निर्वाणा पहासी देवा ।। १० ।।
गोणाई म्हणे माझा नामा देऊनी हातीं । अंगिकारी कीर्ति पंढरिराया ।। ११ ।।


१३
निर्गुणपणाचा अभिमान सांडिला । निगम लाजविला नारायणा ।। १॥
कपट करोनि भक्तांसि तारिसी । तुझा तूं ठकसी पंढरिराया ।।२।।
ठकुली पुंडलिकासी न्यावया वैकुंठासी या बुद्धी आलासी पंडरियें ||३||
तंव त्या भक्तराजें धरियेलें चित्तें । परतोनि मागुतें जाऊं नेदी ||४||
अठ्ठावीस युगे गेलीं विचारितां । निर्गम सर्वथा नव्हे देवा ॥ ५॥
मग कटावरी कर धरोनियां धीर उभा निरंतर राहिलासी ।।६।।
सर्व घे प्रेमें तें हिरोनि बांधिलें । विचारें साधिलें कोर्णे कोणा ॥ ७॥
द्वारीं द्वारपाळ जालासी अंकित सांग बुद्धीमंत कोण ऐसा।।८।।
नाथिलेनि करिसी आपणा गोविसी । बोल कां ठेविसी नामयातें ।।९।।
गोणाई म्हणे तुझें नकळे विंदान। देई कृपादान बाळ माझें ।। १० ।।


१४
माझें घर तुवां पूर्वीच बुडविलें जें दर्शनासी आलें बाळ माझें ।।१।।
नेणों काय वर्म तुझें सांपडलें हातीं । रिघालासी चित्तीं जेणें द्वारें ॥२॥
लौकिक परिहार देखील कासया । मी तुज ऐसिया बरवें जाणें ॥३॥
कटीं ठेउनि कर उभा गरुडपारी हैं तंव अंतरीं हारपला ।।४।।
नाहीं चळणवळण न लावी पात्या पातें। लागलें निरूतें लक्ष तुझें ॥५॥
तुझी याची खूण अंतरींची एकी । दाविसी लौकिकीं भिन्नपण ॥६॥
सांडियेली येणें लौकिकाची लाज नव्हे माझा मज कांहीं केल्या ||७||
तुझेंनि सुखें घाला आनारिमा जाला अभिमान मावळला समूळ याचा ||८||
देहीं में असोनी विदेही दिसत। प्रेमें वोसंडत हृदयकमळीं ।।९।।
तूं अनाथा कैवारी ऐसी वेदवाणी परी कां नये अजोनी कणव तुज ||१०||
गोणाई म्हणे माझा नामा देई हाती लागेन पुढता-मुझे।।११।।


१५
लावोनि भवभयें तुवां केलें साचें। देह नव्हे याचें ऐसें केलें ॥१॥
सुखभोग सर्व दिला टाकोनियां नेणें तुझ्या पायांपरतें कांहीं ॥ २॥
ऐसें काय केलें नामया चाळविलें । समूळ बुडविलें अपणांमाजीं ॥३॥
आम्हां दुर्बळांचा करोनियां घात केला वाताहात घराचार ||४||
आतां तुजविण कोणाचें साउली। पाळली पोसिली तुझी सेवा ॥५॥
संकटीं उदरीं वाहिली म्यां आशा होता भरवसा थोर याचा ॥६॥
तंव तुवां लाविला आपुलिया सर्वे नव्हे मज कांहीं ऐसा केला||७||
काया वाचा मनें सांडोनियां मज अनुसरला तुज मनोभावें ||८||
नकळे तुझी माव काय या दाविलें परतेनासें केलें चित्त याचें ।।९।।
आतां माझा शीण निवारिल कोण । एका तुजविण पांडुरंगा।।१०।।
गोणाई म्हणे देवा देई जीवदान सुखाचें निधान नामा माझा ।। ११॥


१६
राही रखुमाई सत्यभामा माता सिकवा वो कांता बहुतां परी।।१।।
संत सनकादिक साक्ष हे सकळ । येणें माझें बाळ चाळविलें ॥२॥
हा काय आमुचा धनी कीं गोसावी । नाहीं तें शिकवी लेंकुरासी ॥३॥
जाला देव तरी पडों याच्या पायां। मैदावें केलिया भलें नव्हे ।।४॥
भीड तुटलिया नेईन चोघां चारी होईल समसरी याची ||५||
देव कांहीं] आम्ही नसति ऐकिले परी नाहीं देखिले ऐसे को।।६॥
दर्शथि जे जीवित्वाची हानी। नाठवे परतोनि घराचार||७||
कैची वो पंढरी मी वो काय जाणे याच्या पुत्रपणें देखियेली ||८||
या देवासी गेटी जन्ममरण तुटी मावळली गोष्टी संसाराची ॥९ ॥
तुम्ही अवध्याजणी जीवाच्या सांगातिणी पुसा याचे मनीं काय आहे ।।१०।।
देऊनियां नामा मज लावा वाटे। गोणाई म्हणे वोखटें न करा देवा ।। ११।।


१७
अरे विठोबा आतां पाहे मजकडे कारे केलें बेर्डे बाळ माझें ।।१।।
तुझें उच्छिष्ट खादले त्वां काय दिधलें। भलें दाखविलें देवपण ।।२।।
आधीं त्वां तयाचें भोगूं में जाणावें । भक्ता सुख द्यावें आनंदाचें ||३||
गोणाई म्हणे देवा तुज बांधले दायें तरी तुज भ्यावें लागे संतां ॥४॥


१८
हरी त्वां कोणाचें बरवें केलें । पूर्ण आम्हां कळों आलें ।।१।।
नारद वैष्णव जगजेठी। त्यासी लाविली लंगोटी ।।२।।
मयुरध्वज राजा भला । त्यासि करवतीं घातला ।। ३।।
बळी दानशीळ भला । तुवां पाताळ घातला || ४ ||
भीष्म वैष्णवांचा राव त्याचा बाणें पूजिला ठाव ॥५॥
रूक्मांगद हरिचा दास त्याचा गांवच केला वोस ।।६।।
बाळ एकुलतें एक। तें त्वां ज्ञानीच केला शुक ।।७।।
उपमन्यु बाळक पाहें। क्षीरसागरीं कोंडिलें आहे ॥८॥
धुरू बाळक गोजिरवाणें । त्याचें खुंटलें येणें जाणें ।। ९ ।।
हरिश्चंद्र ताराराणी । डोंबा घरीं वाहे पाणी।।१०।।
प्रल्हाद भक्तीचा भुकेला । त्याचा बाप त्वां वधिला ।।११।।
हनुमंत भक्त निकट । त्यासी केलें तूं मर्कट ।। १२ ।।
पुण्यवंत राजा नळ । त्याचा केला तुवां छळ ।।१३।।
श्रियाळ राजा भला त्याचा बाळ त्वां खादला ।।१४।।
तुज कोणी न म्हणे भलें बाळ पोटीचे कोवळें ।। १५ ।।
जिकडे तिकडे तुम्ही दोघे तिकडे तिसरा नामा मागें ।। १६ ।।
तुज नाहीं जाती कुळ । जेऊनि भ्रष्टविलें बाळ ।।१७।।
जेणें तुझें नाम घेतलें । तें संसारावेगळे केलें ।।१८।।
आतां जेविसी तरी तुज आण ऐकोनि हांसे जगज्जीवन ।। १९।।
नामा दिला माते हातीं । नयन भरले अश्रुपातीं ||२०||
माय पाहे नामदेव । तंव तो जाला केशवराव ।। २१ ।।
माय म्हणे नये कामा । तुझा ओपिला तुज नामा।। २२ ।।
गोणाई म्हणे हरी तुझी करणी तुजचि वरी ॥ २३ ॥


१९
गोणाई म्हणे नाम्या वचन माझें ऐक पोटींचें बाळक म्हणोनि सांगे ।।१।।
महिमेचा संसार सांडोनि आपुला संग त्वां धरिला निःसंगाचा ॥२॥
या काय मागसी तो काय देईल । शीघ्रची नेईल वैकुंठासी ।।३।।
सविल्याची लॅकुरें वर्तताती कैसीं तूं मज जालासी कुलक्षय ॥४॥
धनधान्य पुत्र कलत्रें नांदती । तुज अभाग्याचे चित्तीं पांडुरंग ॥५॥
शिवण्या टिपण्या पातले पाणी न पाहासी परतोनि घराकडे ।।६।।
कैसी तुझी भक्ती या लौकिकावेगळी संसाराची होळी केली नाम्या।।७।।
याची तुवां कैसी धरियेली कांस हा तंव कवणास जाला नाहीं ||८||
त्यातें जे अनुसरती त्याचें नुरे कांहीं। देव नव्हे पाही हा घरघेणा ।।९।।
गोकुळीं करी चोरी आफुले पोट भरी तो तुम निर्धारी देईल काई।।१०।।
लक्ष्मीसारिखी सुंदर टाकोनी वाटिका गौळणी गौळीयांच्या ।।११।।
अष्टसिद्धी दासी जयाच्या कामारी कल्पवृक्ष द्वारी कामधेनु ।।१२।।
बळीच्याचि घरा भीक मागूं गेला । धरूनी बांधिला दारवंटा ।।१३।।
कुबज्या करूप कंसाचिया दासी । जीवें भावें तिसी रतलासे ।।१४।।
यातें भजती त्याच्या संसाराची नासी । जडला जीवेंसी नवजाय ।।१५।।
ठकोनियां येणें बहु नाडियेलें । तैसें तुज जालें सत्य जाण ।। १६ ।।
गोणाई म्हणे नाम्या बरें नाहीं केलें । घर बुडविलें कुळासहित ।।१७।।


२०
गोणाई म्हणे नाम्या जल्पसी भलतें । तुज कोण्या दैवतें वोढियेलें ।। १ ।।
लाजिरवाणें तुवां केलें रे हैं जिणें । हांसती पिसुनें देशोदशीं । । २ ।।
सांडीं सांडीं नाम्या तूं हें देवपिसें बळें घर कैसें बुडवितोसी ॥३॥
नवमास उदराभीतरीं वाहिला माझ्या नेणत्या बाळा चाळविलें ||४||
तुझे द्वारी बैसोनि उपवास करिन । नामा घेऊन जाईन गुणराशी ।।५।।
येथें ते होईल लटिकेंचि भांडण । नामा द्यावा म्हणे गोणाई माझा ॥६॥
गोणाई म्हणे नाम्या कळेल तें करी। स्वहित विचारी सांगो किती ।।७।।


२१
पोर निर्दय जालें देवपिसें लागलें। लोकाचें गोविलें तेंहि पोर ।।१।।
नित्य करी अंघोळी धोत्रेंहि फाडिलीं । कळी मांडियेली याही पोरें ||२||
गांवींचे महाजन करिती गुडघे स्नान या पोरां व्यसन अंघोळीचें ॥३॥
जन्मोजन्मीं नेणों आम्ही ह्या तुळसी। या पोरें विवसी मांडियेली ||४||
गोणाई म्हणे नाम्या तुवां भलें केलें । जया वस्य केलें विठोबासी ।।५।।


२२
ज्याचें देव त्या सांगातें मला नवल वाटतें।॥१॥
एक बैसतो अश्वावरी एक चालती चरणचाली ॥२॥
एक जेविती मिष्टात्र एका न मिळे कोरान्न||३||
गोणाई म्हणे धन्य देवा । नामयाचा संचित ठेवा ||४||


२३
सोये सांडिली सर्वांची जोडी केली विठोबाची ||१||
मायबापासी टाकिलें। ध्यान देवाचें लागलें ॥२॥
स्त्री पुत्र बंधु बहिणी केली सर्वांची सांडणी ॥३॥
गणगोत इष्टमित्र सर्व जोडिलें विठ्ठलपात्र ||४||
गोणाई म्हणे नामा। मली केली बारे सीमा।।५।।


२४
नामयाची माता विनवितसे संता म्हणे पुत्रनाथा काय करूं ॥१॥
नामा चाळविला पंढरिये नेला । विठ्ठल मीनला नामदेव ||२||
के अन्नपाणी शिवणी टिपणी अखंड चक्रपाणि हृदयीं बसे ||३||
संत म्हणती गोणाई विपरीत अवधारी नामा पंढरपुरी वैष्णवांमाजीं ॥४॥


२५
देव जाला नामा नामा जाला देव गोणाईचा भाव पाहावया ॥१॥
हा घे तुझा नामा काय चाड आम्हां । आनंदाचा प्रेमा गोणाईसी ||२||
हातीं धरोनियां घेऊनी चालिली फिरून पाहतीजाली तो देव ॥३॥
अगा माझ्या बापा तूं कोणा हवासी मजदुर्बळासी काय होय ॥४॥
सोहळा सहस्र मुख्य अष्ट तुझ्या कांता । त्या माझिया पाता प्रवर्तती ॥५॥
पुंडलिकासी तुवा दिली आहे भाका गोणाई म्हणे तक बहु होसी ॥६॥


२६
माझा नामा मज देई जीव देईन तुझे पायीं ॥१॥
पुंडलिका भुलविलें । तैसें माझे बाळ केलें ॥२॥
तें गा न चले मजपासीं दे गा माझ्या नामयासी ॥३॥
तुज संगतीं जे लागले ते त्वां जितेंचि मारिले ||४||
विठ्ठल म्हणे गोणाई आपुला नामा घेऊनी जाई॥५॥
हातीं धरोनियां गेली। गोणाई तेव्हां आनंदली ॥६॥

(संत नामदेव गाथेतील आत्मनिवेदनपर अभंग संत गोणाईच्या नाममुद्रा असलेले अभंग)


शेतमालाची मोफत जाहिरात करण्यासाठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *