अभंग गाथा

संत जोगा परमानंद अभंग

संत जोगा परमानंद अभंग

“बैसोनि संता घरी हो। घेतली गुरगुंडी ॥ ध्रु०्॥

आधी ब्रह्मांड नारळ। मेरू सत्त्व तो आढळ ॥

निर्मळ सत्रावीचे जळ। सोहं गुरगुंडी, गुरगुडी।।

चिलमी त्रिगुण त्रिविध। मी पण खटा तो अभेद।।

तमतमाखू जाळून शुद्ध। वैराग्य विरळा घडघड़ी ॥

सावधान लावुनिया नळी। मीपण झुरका विरळा गिळी॥

जन्ममरणाची मुरकुंडी सांभाळी। धूरविषयाचा सोडी।

लागला गुरू गोडीचा छद। झाला प्रसन्न परमानंद।।

जोगी स्वामी तो अभंग। गुरुचरण न सोडी।

बैसोनि संताघरी हो। घेतली गुरगुंडी गुरुगुडी।”

“रोमांच स्वरवित। स्वेदबिंदु डळमळितु॥

पाहता नेत्र उन्मलितु। मग मिटोत मागुते॥

ऐशी इवयी प्रकटसी। के माझ्या नरहरी॥

देखता तनु कापे। मनबुद्धि ही हारपे॥

सकळही अहंभाव लोपे। एकतत्त्वचि उरे।”

मन निवाले निवाले । कैसें समाधान झालें ॥

संतं आलिया अवसरी । नवल आरती यांची परी ॥

आनंदे नर नारी । परमानंद प्रकटले ॥

द्यावया आलिंगन । बाह्यां येतसे स्फुरण ॥

सजळ झाले लोचन । जैसे मेघ वर्षती ॥

आजि सुदिन सोहळा । संत जीवनाची कळा ॥

जोगा विनवितो सकळा । भेटी परमानंदेस्त ॥

“द्यावया आलिंगन। बाह्या येतसे स्फुरण।

सजल झाले लोचन। जैसे मेघ वर्षती॥

आजी सुदिन सोहळा। संत जीवनाची कळा ॥

जोगा विनवितो सकळा। भेटी परमानंदासी॥”

“वाचा लोधावली गुणा। स्वरुपी पाहिले लोचना॥

चरणी स्थिरावले मन। जगजीवन देखिलिया॥

तो म्या देखिला देखिला। विठ्ठल पंढरीचा राजा ॥

भानुबिंबे अति सुढाळ। मन मंडित वःक्षस्थळा ॥

चरणी तेजाचे झळाळ। मुगुटी किरणे फाकती ॥

ऐसा नयनी देखिला। तो मज असुमाई झाला॥

जोगा विनवितो विठ्ठला।वोसंडला आनंदु॥”

हे पण वाचा: जोगा परमानंद संत संपूर्ण माहिती


तुमच्या शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या 

संदर्भ: नामदेवरायांची लेखक: डॉ. शिवाजीराव निवृत्ती मोहिते आहे.

ref: transliteral

संत जोगा परमानंद अभंग