संत जगमित्र नागा

संत जगमित्र नागा अभंग

संत जगमित्र नागा अभंग 

अग्नि जाळी तरी न जळे प्रल्हादु। हृदयी गोविंदु म्हणोनिया॥ १॥

आग्नि जाळी तरी न जळे गोपाळु । हृदयी देवकी बाळू म्हणोनिया॥ २॥

अग्नि जाळी तरी न जळती पांडव। हृदयी वासुदेव म्हणोनिया॥३॥

जगमित्र नागा न जळे जरी अग्नि जाळी। हृदयी वनमाळी म्हणोनिया ॥ ४ ॥

कृष्ण लोणी खाया गेला । येऊनि गोपीनें धरिला ॥

मायेपाशी घेऊनि आली । तेथें कृष्ण पाहती जाली ॥

येथें कृष्ण येथे कृष्ण । जिकडे तिकडे अवघा कृष्ण ॥

ऐसे ऐश्वर्य रो माये । जगमित्र नागा पाहुनि धाये ॥

भयभित झाले तेव्हा ग्रामवासी। लावियेल्या वेशी गावाचिया॥

ग्रामवासियांनी लावियेले द्वार। करी विचार सुभेदार तेव्हा ॥

करी गर्जना भयानक व्याघ्र। कापती धरथर सकळ लोक॥”

“हरिजागरासी जावे। माझ्या विठोबासी पाहावे ॥

देव ऋषी सवे येतो। नभी विमाने दाटती॥

काकड आरती दृष्टी पडे। उठाउठी पाप झडे॥

ऐसा आनंद सोहळा। जगमित्र नागा पाहे डोळा ॥

“आई बहु कृपावंत। विश्वजनासी पोषीत॥

रुक्मादेवीस भजती। मनोरथ त्याचे पूर्ण होती।

दिव्य वस्त्र कुंकूम ल्याली। रत्न भरणे ती शोभली ॥

रुक्मादेवी वराच्या चरणी। जगमित्र नागा लोटांगणी ॥ “

“भक्तीसाठी रूपे धरी। त्याचे काम अंग करी ॥

आला पुंडलिकासाठी। अकस्मात जगजेठी ॥

अनंत ब्रह्मांडे रचिली। नाना परी क्रीडा केली।॥

हे तव न कळे कोणासी। जगमित्र नागा ध्यास मानसी॥

“सकळ भूषणांचे भूषण। कंठी धरा नारायण ॥

तेणे तुटती यातना। चुकती यमाच्या पतना॥

शिव मस्तकी धरिला। भेद भक्तांचा काढिला॥

अवघ्या देवांचे हे ध्यान। जगमित्र नागा वंदी चरण।”

“अग्नि जाळी तरी न जळे प्रल्हादु। हृदयी गोविंदु म्हणोनिया॥

अग्नि जाळी तरी न जळती गोपाळू। हृदयी देवकीबाळू म्हणोनिया॥

अग्नि जाळी तरी न जळती पांडव। हृदयी वासुदेव म्हणोनिया।

अग्नि जाळी तरी न जळे बिभिषणाचे घर। हृदयी सीतावर म्हणोनिया।”

संत जगमित्र नागा अभंग  समाप्त 

हे पण वाचा: संत जगमित्र नागा संपूर्ण माहिती


तुमच्या शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या 
संदर्भ: नामदेवरायांची लेखक: डॉ. शिवाजीराव निवृत्ती मोहिते आहे.

ref: transliteral

 

1 thought on “संत जगमित्र नागा अभंग”

  1. purushottam krushnoorkar

    आणखी अभंग श्रीनागा महाराजांचे आहेत

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *