संत सावतामाळी अभंग
१.
ऐकावे विठ्ठल धुरे । विनंती माझी हो सत्वरें ॥ १ ॥
करी संसाराची बोहरी । इतुकें मागतों श्रीहरी ॥ २ ॥
कष्ट करितां जन्म गेला । तुझा विसर पडला ॥ ३ ॥
माळी सावता मागे संतान । देवा करी गा निःसंतान ॥ ४ ॥
२.
कां गां रुसलासी कृपाळूं बा हरी । तुजविण दुसरी भक्ती नेणे ॥ १ ॥
दीन रंक पापी हीन माझी मती । सांभाळा श्रीपती अनाथनाथा ॥ २ ॥
आशा मोह माया लागलीसे पाठीं । काळ क्रोध दृष्टी पाहतसे ॥ ३ ॥
सावता म्हणे देवा नका ठेऊं येथें । उचलोनी अनंते नेई वेगीं ॥ ४ ॥
३.
कांदा मुळा भाजी । अवघी विठाबाई माझी ॥ १ ॥
लसूण मिरची कोथिंबिरी । अवघा झाला माझा हरी ॥ २ ॥
मोट नाडा विहीर दोरी । अवघी व्यापिली पंढरी ॥ ३ ॥
सावता म्हणे केला मळा । विठ्ठल पायीं गोंविला गळा ॥ ४ ॥
४.
आमुची माळियाची जात । शेत लावूं बागाईत ॥ १ ॥
आह्मा हातीं मोट नाडा । पाणी जातें फुलवाडा ॥ २ ॥
शांति शेवंती फुलली । प्रेम जाई जुई व्याली ॥ ३ ॥
सावतानें केला मळा । विठ्ठल देखियला डोळा ॥ ४ ॥
५.
नको तुझें ज्ञान नको तुझा मान । माझें आहे मन वेगळेची ॥ १ ॥
नको तुझी भुक्ती नको तुझी मुक्ति । मज आहे विश्रांती वेगळीच ॥ २ ॥
चरणीं ठेउनि माथा विनवितसे सावता । ऐका पंढरीनाथा विज्ञापणा ॥ ३ ॥
६
पैल पहाहो परब्रह्म भुललें । जगदीश कांहो परतंत्र झालें ॥ १ ॥
काया सुख केलें येणें नेणिजे कोण भाग्य गौळीयाचें वर्णिजे ॥ २ ॥
आदि अंतू नाहीं जया व्यापका । माया उखळी बांधिला देखा ॥ ३ ॥
सर्व सुखाचें सुख निर्मळ । कैसें दिसताहे श्रीमुखकमळ ॥ ४ ॥
योगियां ह्रदयमकळींचें हें निधान । दृष्टी लागे झणी उतरा निंबलोण ॥ ५ ॥
सावत्या स्वामी परब्रह्म पुतळा । तनुमनाची कुरवंडी ओंवाळा ॥ ६ ॥
७.
मागणें तें आह्मा नाहीं हो कोणासी । आठवावें संतासी हेंचि खरें ॥ १ ॥
पूर्ण भक्त आह्मां ते भक्ती दाविती । घडावी संगती तयाशींच ॥ २ ॥
सावता म्हणे कृपा करी नारायणा । देव तोचि जाणा असे मग ॥ ३ ॥
८.
भली केली हीन याति । नाही वाढली महंती ॥ १ ॥
जरी असतां ब्राह्मण जन्म । तरी हें अंगीं लागतें कर्म ॥ २ ॥
स्नान नाहीं संध्या नाहीं । याति कुळ संबंध नाहीं ॥ ३ ॥
सावता म्हणे हीन याती । कृपा करावी श्रीपती ॥ ४ ॥
९.
विकासिला नयन स्फुरण आलें बाहीं । दाटले ह्रदयीं करुणाभरितें ॥ १ ॥
जातां मार्गी भक्त सावता तो माळी । आला तया जवळी पांडुरंग ॥ २ ॥
नामा ज्ञानदेव राहिले बाहेरी । मळिया भीतरीं गेला देव ॥ ३ ॥
माथा ठेऊनि हात केला सावधान । दिलें आलिंगन चहूं भुजीं ॥ ४ ॥
चरणीं ठेऊनि माथा विनवितो सावता । बैसा पंढरीनाथा करीन पूजा ॥ ५ ॥
१०.
समयासी सादर व्हावें । देव ठेविले तैसें रहावें ॥धृ०॥
कोणे दिवशीं बसून हत्तीवर । कोणे दिवशीं पालखी सुभेदार ।
कोणे दिवशीं पायांचा चाकर । चालून जावें ॥ १ ॥
कोणे दिवशीं बसून याचीं मन । कोणें दिवशीं घरांत नाहीं धान्य ।
कोणे दिवशीं द्रव्याचें सांठवण । कोठें साठवावें ॥ २ ॥
कोणे दिवशीं यम येती चालून । कोणे दिवशी प्राण जाती घेऊन ।
कोणे दिवशीं स्मशानीं जाऊन । एकटें रहावें ॥ ३ ॥
कोणे दिवशीं होईल सद्गुरूची कृपा । कोणे दिवशीं चुकती जन्माच्या खेपा ।
कोणें दिवशीं सावत्याच्या बापा । दर्शन द्यावें ॥ ४ ॥
११.
नामाचिया बळें न भीऊं सर्वथा । कळिकाळाच्या माथा सोटे मारूं ॥ १ ॥
वैकुंठीचा देव आणूं या कीर्तनीं । विठ्ठल गाऊनी नाचो रंगीं ॥ २ ॥
सुखाचा सोहळा करुनी दिवाळी । प्रेमें वनमाळी चित्तीं धरूं ॥ ३ ॥
सावता म्हणे ऐसा भक्तिमार्ग धरा । तेणें भक्तिद्वार वोळंगती ॥ ४ ॥
१२.
उठोनी प्रातःकाळीं करूनियां स्नान । घालुनि आसन यथाविधी ॥ १ ॥
नवज्वरें देह जाहालासे संतप्त । परि मनीं आर्त विठोबाचें ॥ २ ॥
प्राणायाम करूनी कुंभक साधिला । वायु निरोधिला मूळ तत्त्वीं ॥ ३ ॥
शके बाराशें सत्रा शालिवाहन शक । मन्मथ नामक संवत्सर ॥ ४ ॥
ऋतु ग्रीष्म कृष्ण आषाढ चतुर्दशी । आला उदयासी सहस्त्र कर ॥ ५ ॥
सावता पांडुरंगीं स्वरूपीं मीनला । देह समर्पिला ज्याचा त्यासी ॥ ६ ॥
१३.
माझी हीन याती माझी हीन याती। तुम्ही उदार श्रीपती ॥१॥
नका देऊ भक्ती मुक्ती । माझी परिसावी विनंती ॥२॥
सावता म्हणे पांडुरंगा। दुजेपण न्यावे भंगा ॥३॥
१४.
शिव ब्रम्हां विष्णू तिन्ही देव एक । जे निराकार सम्यक विठ्ठल माझा ॥१॥
विठ्ठल नामाचा महिमा अगाध । होणे पुर्ण बोध ऐशा परी ॥२॥
अद्वैत वासना संतांचि संगती। रायांची उपाधी बोलू नये ॥३॥
हरि मुकुंद मुरारी…. । हा मंत्र उच्चारि, सावता म्हणे ॥४॥
१५.
विठोबाचे पाय राहो अखंड चित्ती । अखंड श्रीपती हेचि द्यावे ॥१॥
ध्यानीं मनीं वनीं असता सर्व काळ । साधी काळ वेळ याचि परी ॥२॥
नाम हे तारक साचार जीवाचे । सावता म्हणे वाचे सदा घेई ॥३॥
१६.
जगीं तारक एक नाम । उत्तम धाम पंढरी ॥१॥
चला जाऊ तया गावा। पाहू देवा विठ्ठला ॥२॥
वंदु संत चरण रज । तेणे काज आमुचे ॥३॥
सांवता म्हणे विटेवरी उभा सम चरणी हरी ॥४॥
आमच्या माहिती प्रमाणे संत सावतामाळींचे अभंग ३७ उपलब्ध आहेत. आमच्या कडे आलेल्या संग्रहा प्रमाणे १६ अभंग आम्हाला भेटले. उरलेले इतर अभंग जर आपल्याला माहिती असतील तर संत साहित्य मध्ये कळवावे अथवा खाली comment मध्ये टाकावे ते सर्वांसाठी खुले करू. धन्यवाद money .
तुमच्या शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या
src:web.bookstruck.in/book/
संत सावतामाळी अभंग संत सावतामाळी अभंग
Do reminding sant Sakata abandon to send
संत सावता माळी यांचे अभंग लिहिणारे संत काशिबा गुरव यांच्या बद्दल अधिक माहिती मिळेल का?
Pingback: उचित जे तुम्हा गोडी - संत सावतामाळी महाराज सार्थ अभंग - 17 - sant sahitya
Pingback: एक नाम हरी द्वैत्य नाम दुरी - संत सावतामाळी महाराज सार्थ अभंग - 12 - sant sahitya
Pingback: विठोबाचे पाय राहो अखंड - संत सावतामाळी महाराज सार्थ अभंग - 7 - sant sahitya
Pingback: कां गां रुसलासी कृपाळूं बा हरी - संत सावतामाळी महाराज सार्थ अभंग 2 - sant sahitya
Pingback: मागे बहुताचा लाग - संत सावतामाळी महाराज सार्थ अभंग - 19 - sant sahitya
Pingback: विश्रांति सुखासि सुख पैं जाहलें - संत सावतामाळी महाराज सार्थ अभंग - 29 - sant sahitya
Pingback: नेणो योग-याग तपे - संत सावतामाळी महाराज सार्थ अभंग - 24 - sant sahitya
Pingback: मागणे ते आम्हा नाही हो कोणासी -संत सावतामाळी महाराज सार्थ अभंग -37 - sant sahitya
Pingback: विश्रांतीचा ठाव - संत सावतामाळी महाराज सार्थ अभंग - 32 - sant sahitya
Pingback: मंगल मंगल नाम विठोबाचे - संत सावतामाळी महाराज सार्थ अभंग - 3 - sant sahitya
Pingback: नामाचिया बळे न भिऊ सर्वथा - संत सावतामाळी महाराज सार्थ अभंग -5 - sant sahitya
Pingback: प्रपंची असुनी परमार्थ साधावा - संत सावतामाळी महाराज सार्थ अभंग - 10 - sant sahitya
Pingback: नको तुझे ज्ञान नको तुझा मान - संत सावतामाळी महाराज सार्थ अभंग - 6 - sant sahitya
Pingback: शिव, ब्रह्मा, विष्णू तिन्ही देव एक - संत सावतामाळी महाराज सार्थ अभंग - 21 - sant sahitya
Pingback: जगी तारक एक नाम - संत सावतामाळी महाराज सार्थ अभंग - 16 - sant sahitya
Pingback: कृपाळू तू हरी - संत सावतामाळी महाराज सार्थ अभंग - 11 - sant sahitya
Pingback: जपतप क्रिया धर्म साधन - संत सावतामाळी महाराज सार्थ अभंग - 26 - sant sahitya
Pingback: लागलासे काळ पाठी - संत सावतामाळी महाराज सार्थ अभंग - 27 - sant sahitya