तुमच्या पायीं माझें – संत निळोबाराय अभंग – ६१२
तुमच्या पायीं माझें हित ।
होईल निश्चित हेंचि वाटें ॥१॥
आणखी कोणा शरण जाऊं ।
आहे उपाऊ तुम्हां हातीं ॥२॥
सहज कृपा अवलोकाल ।
तरी पाववाल निजठाया ॥३॥
निळा म्हणे संचित माझें ।
आड श्रीराजे न घालावें ॥४॥