चहूं आश्रमांचे धर्म – संत तुकाराम अभंग – 369
चहूं आश्रमांचे धर्म ।
न राखतां जोडे कर्म ॥१॥
तैसी नव्हे भोळी सेवा ।
एक भावचि कारण देवा ॥ध्रु.॥
तपें इंद्रियां आघात ।
क्षणें एका वाताहात ॥२॥
मंत्र चळे थोडा ।
तरि धडचि होय वेडा ॥३॥
व्रत करितां सांग ।
तरी एक चुकतां भंग ॥४॥
धर्म धर्मा सत्त्वचि कारण ।
नाहीं तरी केला सिण ॥५॥
भूतदयेसि आघात ।
उंचनिच पाहे चित्त ॥५॥
तुका म्हणे दुजें ।
विधिनिषेधाचें ओझें ॥॥
अर्थ
चारीआश्रमांना जे ठरवून दिलेले विहित कर्म आहेत ते जर व्यवस्थित पार पडले नाही किंवा केले नाही तर काहीही उपयोग होत नाही.पण जर भगवंताविषयी भोळी सेवा केली तर तशी ती फार कठीण नाही तेथे फक्त भगवंताविषयी भक्ति भाव हवा आहे.अनेक वर्ष तपे करावी आणि जरी इंद्रियनिग्रह न करावा तर हजारो वर्षांची केलेली तपश्चर्या एका क्षणात वाताहात होते.वेदमंत्र उच्चार करतान त्या काही थोडी जरी चूक झाली तर मग तो कितीही शहाणा असेल तरी तो वेडा ठरला जातो अशी भीती तेथे असते.अनेक कर्मे केली पण एखाद्या वेळीचूक आढळली तर मागील सर्व व्रते भंगतात.कोणतेही धर्मकार्य करण्यास सत्व गुण आवश्यक असते नाही तर व्यर्थ शिन होतो.भूत दया करावयास गेले आणि हा लहान हा मोठा व भेद केला तर त्या भूत दयेवर आघात होतो.तुकाराम महाराज म्हणतात हरी भक्ती जर सोडली तर इतर सर्व मार्गा मध्ये विधिनिषेधाचे ओझे आहे.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
झाड कल्पतरू – संत तुकाराम अभंग
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.